Sunday, October 6, 2024

जिजामाता पब्लिक स्कूल इंग्रजी भाषेचे ज्ञानपीठ व्हावे-डॉ.क्षितीज घुले पाटील

भेंडा/नेवासा

भारतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, तसे बदलत्या काळात वेगवेगळाच्या देशात प्रांतीक भाषा वेगवेगळ्या आहेत. परंतु इंग्रजी ही वैश्विक भाषा सर्व देशात विचारांची देवाणघेवाण, तंत्रज्ञानाची आदान प्रदान करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत शिक्षण घेऊन भविष्यात जिजामाता पब्लिक स्कूल इंग्रजी भाषेचे ज्ञानपीठ व्हावे, असा आशावाद श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.क्षितीज घुले पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंती निमित्त अॅड. हिंम्मतसिंह देशमुख मित्र मंडळ,दै.नगर शाही व जिजामाता पब्लीक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रंगभरण स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरुन डॉ. क्षितीज घुले पाटील बोलत होते.
अॅड.हिंम्मतसिंह देशमुख,शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे, दै.नगर शाहीचे संपादक प्रा. ईस्माइल शेख, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा आरगडे, प्राचार्य डॉ.राजेंद्र गवळी, उपप्राचार्य दिपक राऊत, सुदिप खरात, प्रविण कोकरे, राणी स्वामी, तबसूम शेख, अर्चना मिसाळ, आदिती अभंग यांच्यासह शिक्षक,पालक उपस्थित होते.

अॅड.हिंम्मतसिंह देशमुख म्हणाले, स्व.मारुतराव घुले पाटील यांनी ग्रामीण भागातील विदयार्थ्यांकरिता भेंडा येथे आयटीआय,विद्यालय,वरीष्ठ महाविद्यालय या विविध माध्यमातून शिक्षणाची दारे खुली केली. वयाप्रमाणे मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार महत्वाचे आहेत. ग्रामीण भागातील विदयार्थी जगाच्या स्पर्धेत टिकला पाहिजे अशा प्रकारचे शिक्षण घेऊन त्यांनी नावलौकिक मिळवावा.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.डॉ. राजेंद्र गवळी यांनी केले. सोपान नरुटे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेखा राऊत यांनी आभार मानले.

*रंगभरण स्पर्धेतील विजेते…

प्रथम क्रमांक- धायतडक आरोही,द्वितीय क्रमांक- महापूर सृष्टी व आरगडे हिंदवी, तृतीय क्रमांक-पटेल महीरा. इतर १० विद्यार्थी या यशस्वी विद्यार्थीना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!