Sunday, March 29, 2026

नगर जिल्ह्यातील महाराज मंडळींची पालकमंत्री विखेकडे मागणी मंदिराच्या परिसरात दारु व मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:धार्मिक स्थळाजवळ मद्यविक्री आणि मांस विक्रीच्या दुकानांना निर्बंध घालावेत आणि ही दुकाने धार्मिक स्थळापासून विशेष अंतरावर असावेत, अशी मागणी अहमदनगर येथील

वारकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर माऊली सृष्टीचे आराखडा सादरीकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून आलेल्या

वारकरी संप्रदायातील महाराजांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी धार्मिक स्थळाचे पवित्रा टिकावे, यासाठी ही मागणी करण्यात आली. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आपण या सूचनेचे स्वागत करतो आणि राज्य सरकारकडे

याबाबत पाठपुरावा करू असं म्हटलं आहे. तसेच धार्मिक स्थळावरील अतिक्रमण हा देखील महत्वाचा विषय आहे. मात्र अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल. कारण एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त करून आपल्याला विकास करायचा नाही

तर त्यांचा देखील विकास आरखाड्यात कसा समावेश करता येईल याचा विचार आम्ही करत आहोत, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, नेवासा तालुक्यातील पैस खांब मंदिर परिसरात जवळपास 850 कोटी रुपये खर्च करून संत ज्ञानेश्वर माऊली

सृष्टी उभारण्यात येत आहे. या माऊली सृष्टीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मापासून ते संजीवन समाधीपर्यंतचा काळ चित्र-शिल्प आणि अत्याधुनिक ऑडीओ-व्हिज्युअल स्वरूपात साकारण्यात येणार आहे. यासाठी संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखडाही तयार करण्यात आला आहे.

या आराखड्यात कोणत्या सुविधा हव्यात, याची माहिती घेण्यासाठी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी सहकार सभागृहात संत-महंत व महाराज यांची बैठक घेतली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!