Monday, April 13, 2026

शहरटाकळी येथे नवरात्रोत्सव निमित्ताने गुरुवर्य स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराजांची सदिच्छा भेट

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

 

शेवगाव प्रतिनिधी: शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील खंडोबा नगर येथे सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाला देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी गुरुवर्य स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांनी शनिवारी 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सदिच्छा भेट दिली आहे.

गुरुवर्य स्वामी प्रकाशानंदगिरिजी महाराज यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्व घरासमोर रांगोळी, सडा काढून फटाके वाजवून स्वागत केले.येथील नवरात्रोत्सव निमित्ताने मोहटादेवी गडावरून मोठ्या उत्साहात ज्योत घेऊन तरूण मंडळ येतात.

दररोज विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या मध्ये दांड्या, संगीत खुर्ची, रांगोळी , शालेय विद्यार्थ्यांचे विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जात आहे. सातव्या माळेच्या दिवशी फराळाचे महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!