Thursday, February 12, 2026

शेवगावमध्ये विधवा महिला सन्मान व संरक्षण सोहळयाचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

शेवगाव येथील स्त्री शक्ती फाऊंडेशन व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १०:३० वाजता विधवा महिला सन्मान व संरक्षण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि.११ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १०:३० वाजाता लोकनेते मारुतरावजी घुले पाटील जिनींग नेवासा रोड, शेवगाव ता. शेवगाव येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सन्मान सोहळ्याचे उदघाटन बाल कल्याण विकास अधिकारी नारायण कराळे यांचे हस्ते होईल.
सोलापूर येथील विधवा महिला सन्मान कायदयाचे अभ्यासक प्रमोद झिंजाडें
व विधवा महिला सन्मान कायदा राज्य समन्वयक राजुभाऊ शिरसाठ यांचे मार्गदर्शन होईल.

एकल महिला पुनवर्सन समितीचे
राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी,शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती
डॉ. क्षितीज घुले पाटील,काकासाहेब नरवडे,अरुण लांडे पाटील, ताहेर पटेल,
तहसिलदार प्रशांत सांगडे,पोलीस निरीक्षक समाधान नांगरे,गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर,शरद आरगडे, संजय कोळगे,श्रीम. लक्ष्मीताई देशमुख यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
स्त्री शक्ती फाऊंडेशनचे संस्थापक प्रथमेश सोनवणे,उपाध्यक्षा फरजाना बाबामियाँ सय्यद,सचिव सौ. रंजना प्रथमेश सोनवणे
यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!