Tuesday, February 11, 2025

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी:मी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं यांनी केले विधान….

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठी बिग बॉसचा समारोप होताच हिंदी बिग बॉसच्या 18 व्या सीजनमध्ये मराठी सदस्यांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच वकील गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात धडाकेबाज

एन्ट्री करताच सर्व सदस्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. बिग बॉसचा हा सीजन सुरु होण्याआधीच सदावर्तें या घरात ढाराढूर झोपले होते. त्यामुळे सदावर्तेंची राजकीय वर्तुळासह मनोरंजन विश्वात तुफान चर्चा रंगली.मराठा आरक्षणविरोधी याचिका,

एसटी संपाचं नेतृत्व करणे, अशा गोष्टींमुळे सदावर्ते महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले. तसच महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर आक्रमकपणे भूमिका मांडण्याबाबतही सदावर्तेंच्या नावाची चर्चा असते. अशातच त्यांनी पुन्हा

एकदा राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार कशामुळे पडलं? यामागची सर्व कारणे सदावर्तेंनी बिग बॉसच्या सदस्यांना सांगितली आहेत.सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचारी सुद्धा शासकीय सेवेत असावेत.

सरकारने त्यांना सेवेत घ्याव. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन मिळावं. एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी संप पुकारला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सहा महिने सुरु होता. त्यावेळ या संपाचं नेतृत्व

गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. मुंबईच्या आझाद मैदानावर हा संप पुकारण्यात आला होता. या संपामुळेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार पडलं, असं म्हणथ गुणरत्न सदावर्ते

यांनी बिग बॉसच्या घरात राजकीय बॉम्ब फोडला.बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी इतर स्पर्धकांशी संवाद साधला. यावेळी सदावर्ते म्हणाले, “बग्गाजी मी आलो. माझ्या मुलाचं लग्न आहे. म्हणून मी अशा स्टाईलचा चष्मा घातला आहे.

आमच्याशी नडण्याची कोणत्या मायकलालची ताकद आहे का? मुंबईवर मी राज करतोय. तुम्ही कलाकार आहात.तुम्ही कला दाखवता. आम्ही राज करतो. आम्ही डाकू लोकांच्या कुटुंबातून आलो आहोत.

बिग बॉसच्या घरात एका स्पर्धकाने गुणरत्न यांना विचारलं की, तुम्ही मुंबईत कुठे राहता? यावर गुणरत्न म्हणाले, मी दादरच्या हिंदमाता येथे राहतो. मुंबईत तीनच शक्तीकेंद्र आहेत. एक उद्धव ठाकरे, दुसरा शरद पवार आणि तिसरं गुणरत्न सदावर्तेंचा आहे.

एक गुणरत्न लाख गुणरत्न बोलतात, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!