भेंडा.इंडियन नेव्ही साठी दिलेल्या देश पातळीवरील परीक्षेत उत्तीर्ण होऊन नेव्ही मध्ये यशराज ढमाळ याची सब लेफ्टनंट पदी निवड झाली आहे.
यशराज याला लहानपणापासून लष्करात जाऊन देशसेवा करण्याची आवड होती. यातूनच त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल येथे घेतले. त्यानंतर इंडियन मेरिटियन इंडियन युनिव्हर्सिटी कोलकत्ता येथे मरीन इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा देऊन इंडियन नेव्ही मध्ये सब लेफ्टनंट पदी त्याची निवड झाली आहे.
यशराज ढमाळ हा भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष कै. यशवंतराव ढमाळ यांचा नातू असून पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील प्रवीण ढमाळ व नेवासा तालुक्यातील चांदा येथील मंडल अधिकारी सौ. अमृता ढमाळ यांचा तो चिरंजीव आहे.