Monday, March 30, 2026

नगर जिल्ह्यात कांद्याला ८ हजार १०० रुपये उच्चांकी भाव 

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात शुक्रवारी जुन्या कांद्याला ८ हजार १०० रुपये हा उच्चांकी भाव मिळाला.

बाजार समितीमध्ये मोकळा कांदा खरेदी शुभारंभ पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या हस्ते झाला.यावेळी लिलावामध्ये रावतळे येथील शेतकरी विजय शिंद यांच्या जुन्या कांद्याला ८ हजार १०० तर इतर कांद्याला १ हजार ९०० पासून

४ हजार ८०० रुपये भाव मिळाला. शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार, गुरुवार, शनिवार या दिवशी गोणी कांदा मार्केट सुरु राहणार आहे. याठिकाणी शुक्रवारपासून मोकळा कांदा खरेदीसा सुरुवात करण्यात आली. येथे पहिल्याच

दिवशी १५ वाहनांमधून मोकळा कांदा आला. यामध्ये ८ हजार १०० पासून १ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. आठवड्यातील मंगळवार व शुक्रवारी मोकळा कांदा मार्केट सुरु राहणार आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या उमराणा बाजार समितीमध्ये काल नवीन लाल कांद्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. लिलावाच्या सुरुवातीच्या दिवशीच कांद्याला प्रतिक्विंटल 6161 रुपयांचा दर मिळाला आहे. उमराण्याच्या राजेंद्र देवरे यांच्या

बैलगाडीला लिलावाचा मान मिळाला आहे. काल बाजार समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कसमादे परिसरातील मोठी बाजार असा नावलौकिक असलेल्या उमराणा बाजार समितीमध्ये दसऱ्याला नव्या लाल कांद्याच्या लिलावाचा

सीमोल्लंघन करण्याची व मुहूर्ताला लाल कांद्याला जास्त भाव देण्याची परंपरा आहे. आज दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्यात आली होती. उमराण्याच्या राजेंद्र देवरे यांच्या बैलगाडीला लिलावाचा मान मिळाला.बाजार समितीच्यावतीने

त्याचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या दरामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. यंदा देशभरात चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा मान्सून देशातील अनेक भागात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक भागात शेती पिकांना फटका

देखील बसला आहे. दरम्यान, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झल लागत असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!