Thursday, March 19, 2026

प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटेंचा उद्या प्रचाराचा शुभारंभ

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज.नेवासा विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहेत.यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या सकाळी 9 वाजता खोलेश्वर गणपती मंदिर नेवासा या ठिकाणाहून होणार आहे अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले आहे.

 

मुरकुटे पुढे बोलताना म्हणाले की प्रचाराचा शुभारंभ होऊन पुढे मोहनीराज मंदिर, ज्ञानेश्वर मंदिर व नेवासा शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. पुढे खुपटी,गोमळवाडी, धनगरवाडी यागावात प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या मध्ये सर्व प्रहार जनशक्ती पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जयहरी परिवार , माता भगिनी, युवक उपस्थित राहणार आहेत.

 

या प्रचार शुभारंभासाठी मतदारसंघातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नेवासा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे व प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!