Thursday, December 12, 2024

नेवासा-महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

221 नेवासा विधानसभेचे महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व गुरुवर्य भास्करगिरी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.

कुकाणा येथे न्यामत शहावली दर्गा येथे चादर अर्पण करून कार्यकर्ता मेळावा घेतला.उद्योजक प्रभाकर शिंदे मेळाव्याचे अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल भैय्या शेख,भारतीय जनता पार्टीचे विधानसभा संयोजक सचिन देसरडा, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, जिल्हा सचिव प्रताप चिंधे, युवा नेते ऋषिकेश शेटे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे, भाजप नेवासा शहराध्यक्ष रोहित पवार, युवा नेते मनोज पारखे, त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव गंगावणे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, तालुका अध्यक्ष सुरेश डिके, संजय पवार, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख बापूसाहेब दारकुंडे, राजू मते,भाजप वैद्यकीय सेलचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब कोलते, महायुतीचे प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे तसेच व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अशोक मोरे व त्यांचे सर्व पदाधिकारी , भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकरराव गर्जे,अड.विश्वास काळे, भाजप महिला आघाडीच्या डॉ. विद्या कोलते, जिल्हा परिषद सदस्य तेजश्री लंघे,भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अमृता नळकांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
अनेक वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी तालुक्यातील महायुतीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून एकच निर्धार करण्यात आला त्यानंतर तालुक्यातील उस्थळ चिकणी खामगाव,भेंडा,रांजणगाव,गोपाळपूर,खडकाफाटा,गोगलगाव, गिडेगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!