Thursday, May 14, 2026

आ.गडाखांच्या प्रचारार्थ नेवासा शहरात रॅली

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आ. शंकरराव गडाख यांच्या प्रचारासाठी दि.५ नोव्हेंबर रोजी नेवासा शहरात मोठी रॅली  पार पडली. या रॅलीत शहरातील अनेकांनी मोठा सहभाग नोंदविला. नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत असल्याने प्रचारात रंगत आली आहे. खोलेश्वर मंदिरात शंकरराव गडाख यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

विजय गडाख यांच्या उपस्थितीत नेवासा शहरातील गणपती चौक, नगरपंचायत चौक, नाईकवाडी गल्ली, राम मंदिर, जुना कोर्ट परिसर, मोहिनीराज मंदिर, मारुती चौक, औदुंबर चौक, बाजारपेठ, श्रीरामपूर रोड या मार्गे ही फेरी गेली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!