Wednesday, February 11, 2026

भाविनिमगाव येथे चंद्रशेखर घुले पाटील यांचा प्रचार शुभारंभ

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

शेवगाव

शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथे जगदंबा चरणी नारळ अर्पण करून शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे.

मंगळवार दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी जगदंबेच्या चरणी नारळ अर्पण करण्यात आला.त्यानंतर प्रचार सभा झाली. या प्रचार सभेला माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, डॉ. क्षितिज घुले पाटील, काकासाहेब नरवडे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना चंद्रशेखर घुले म्हणाले की,गेली १० वर्षे तालुक्यातील जनतेसाठी आंदोलन, संघर्ष आणि त्याग करत आलो आहोत. आज गरज आहे तालुक्यातील आपले अस्तित्व दाखवण्याची, स्वाभिमान जागृत होऊ द्या. कुठल्याही पक्षाने आपल्या तालुक्याला जवळ केलेले नाही त्यामुळे आपण आपल्यालाच कामी येणार आहोत. तेव्हा तालुक्याचा व स्वतःचा स्वाभिमान जागा करून आपले अस्तित्व दाखवण्याची गरज असुन आपण आणि आपला माणूस याची सांगड घालून निवडणुकीला सामोरे जाऊ आणि तालुक्यातील आमदार निवडून आणा
असे आवाहन घुले यांनी केले.

माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रहार संघटनेचे देवा शिदोरे, ढोरसडे सरपंच माऊली निमसे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अनिल मडके, ज्ञानेश्वरचे संचालक शिवाजीराव गवळी, बाळासाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
मिलिंद कुलकर्णी यांनी प्रस्ताविक केले.प्रविण मरकड यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!