Friday, March 28, 2025

तिसगावचे युवकाचा मृतदेह गोदावरी नदीत; गोळी झाडून खून झाल्याचा संशय

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तिसगाव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर येथील राहणाऱ्या कल्याण देविदास मरकड या व्यक्तीचा मृतदेह प्रवरासंगम येथे प्रवरा नदीच्या पात्रात सोमवार दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मिळून आला होता.

प्रवरा नदीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याबाबत नागरिकांनी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना माहिती दिली होती.
जाधव यांनी पोलिसांना तातडीने घटनास्थळी पाठवले होते. मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर कपाळावर खोल भोक असलेली जखम दिसून आल्याने सदर युवकाचा खून झाल्याचा दाट संशय निर्माण झाला. तपासाची चक्रे वेगाने फिरवुन सदर घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत असता तिसगाव येथील राहणारा कल्याण मरकड हा व्यक्ती 1 नोव्हेंबरच्या रात्री पासून गायब झाला असून या बाबत त्याचा भाऊ प्रसाद मरकड रा. तिसगाव याने पोलीस ठाणे पाथर्डी येथे मनुष्य मिसिंग क्र. 129/2024 अन्वये नोंद केली असल्याचे दिसून आले. नेवासा पोलिसांनी मृतकच्या नातेवाईकांशी तातडीने संपर्क केला. या घटनेबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे अकस्मात मयत नोंद करण्यात आला होता. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रथम ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे आणण्यात आला परंतु कपाळावर खोल भोक असलेली जखम असल्याने सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला होता, परंतु सदरची जखम ही एखाद्या अग्नीशास्त्राने केली असावी असा दाट संशय आल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालय संभाजीनगर येथे पाठवण्यात आला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव सुनील पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कल्लूबर्मे, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना तपासाबाबत बारकाईने सूचना दिल्या. दरम्यान या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी देखील गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथके रवाना केली आहेत. सदर घटनेचा उलगडा लवकरच करू असा विश्वास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा दिनेश आहेर यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण मरकड याचा खून झाल्या बाबत मृतकाचा चुलत भाऊ प्रसाद मरकड याने रात्री उशिरा पंकज राजेंद्र मगर व ईरशाद जब्बार शेख दोन्ही रा. तिसगाव यांच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!