नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथे माजी आ.शंकरराव गडाख यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पणे युवा नेते उदयनदादा गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला.
तरवडी येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी भगवान खंडोबारायाची मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याच शुभमुहूर्तावर माजी आ.शंकरराव गडाख यांच्या विकास निधीतील सभामंडपाचा भव्य लोकार्पन सोहळा उदयनदादा गडाख यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
तरवडी गावामध्ये माजी आ.शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली चार सभामंडपांचे काम पूर्ण झालेले आहे. या सभामंडपाच्या माध्यमातुन संतांची, वारकऱ्यांची व भाविकभक्तांची सेवा घडत आहे. गावकरी बांधव व भाविकभक्तांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी महंत सुनीलगिरीजी महाराज,गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण व युवक मित्र, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.