नेवासा
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावाला शिंगवे तुकाईला वांबोरी चारीचे पाणी मिळावे अशी मागणी पांडुरंग होंडे यांनी केली आहे.
नेवासाचे तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,
शिंगवे तुकाई हे गांव कमी पर्जन्यमान असलेले गाव आहे. शिंगवे तुकाई गावापासून सात कीलोमीटर पासून मुळा उजवा कालवा गेलेला त्या पाण्याचा कुठल्याही प्रकारे फायदा या गावाला होत नाही, त्यामुळे शिंगवे तुकाई गावातील रबीचे पिके गहु, हरबरा, कांदा या पिकांना पाणी रहिलेले नसुन पिके जळून चालले आहेत. त्यामुळे तातडीने वांबोरी चारीचे पाणी दयावे.नाहीतर शिंगवे तुकाई ग्रामस्थ सोमवार दि.१०/०३/२०२५ रोजी तुकाईदेवी मंदीर या ठिकाणी उपोषणाला बसतील असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर पांडुरंग होंडे, दत्तात्रय पवार,
विठ्ठल पवार,भाऊसाहेब पवार,गणेश पवार,पांडुरंग पवार, कचरू पवार, कारभारी पवार,प्रविण पवार, संकेत पवार, अमोल पवार यांच्या सहया आहेत.