राहुरी
राहुरी येथील साईआदर्श मल्टिस्टेट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त राहुरी फॅक्टरी येथील कार्यालय मुख्य सभागृहात ७ व ८ मार्च रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे करण्यात माहिती संस्थापक आल्याची चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी दिली.
शुक्रवार दि.७ मार्च रोजी सकाळी १० वाजता साईआदर्श मल्टिस्टेट व बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते ४ या वेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिर होईल. यावेळी रुग्णांना मोफत चष्मा वाटप, तसेच गरजूंना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया मोफत असून, रुग्णांचा प्रवास व भोजनाचा खर्च साईआदर्श संस्था करणार आहे. शनिवार दि.८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपूजे, राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, डॉ. स्वप्नील माने, डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. महेश मिस्तरी, देवळाली मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलिस कॉन्स्टेबल राधीका कोहकडे व पोलीस प्रशासनात निवड झालेले पूजा बाजीराव पवार, हर्षदा शिंदे, वैभव लांडगे, अभिषेक कटारे, संदीप हिंगे, सौरभ जाधव, राहुल सप्रे, शुभांगी बाचकर, रवीना कदम, सुनीता बर्डे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.