नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील दादासाहेब माळवदे यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवत बँकेत सापडलेले २५ हजार रुपये संबधित व्यक्तीला परत केल्याने माळवदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबद अधिक माहिती अशी की, सोमवार
दि. २४ रोजी रामभाऊ पेहेरे महाराज यांनी भेंडा येथील बडोदा बँकेतून २५ हजार रुपये काढले व खिशात ठेवत ते बँकेच्या बाहेर आले. परंतु नोटांचा बंडल खिशात न जाता तो बँके बाहेरील मोकळया जागेत खाली पडला. हे पेहेरे यांच्या यांच्या लक्षात आले नाही. ते तसेच पुढे निघुन गेले.त्याच वेळी बँकेत येत असलेले ज्ञानेश्वर कारखान्याच्या पारिजात महिला संस्थेत कार्यरत असलेले दादासाहेब माळवदे यांनी तो नोटांचा बंडल घेऊन पेहरे महाराजांना आवाज दिला व आपले पैसे खाली पडले होते,असे सांगून त्यांना बंडल परत केला.दादासाहेब माळवदे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.