नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा-देवगांव शिवारात बिबट्याच्या मुक्त संचार असल्याचे दिसून आल्याने या बिबट्याला पकडण्यासाठी दि.२३ रोजी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असून रात्री उशिरा बिबट्यासह पिंजरा नगर येथील वनविभागाच्या मुख्यालयाकडे नेण्यात आला.
गेल्या महिन्यापासून भेंडा-देवगांव शिव रस्ता शिवारात ही बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला.त्यामुळे भेंडा-देवगांव शिवारातील शेतकरी व नागरिक भयभीत झालेले आहे. उस-केळी बिबट्याच्या भीतीने मजूर शेतात काम करीना आणि शेतकऱ्यांन रात्री पिकांना पाणी देता येईना,त्यामुळे वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करवा अशी मागणी होत होती.शेतकऱ्यांनी वनविभागाकडे यबाबद पाठपुरावा केला होता. त्यानुसार वनविभागाचे रविवार दि.२३ रोजी दुपारी २ वाजता देवगांव शिवारातील शेतकरी गोविंद शिवराम देवतरसे यांच्या गट नंबर ९७ मधील उसाच्या शेताजवळ पिंजरा लावला. त्याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
शेतकरी बाळासाहेब वाघ हे सांयकाली उशिरा पिंजऱ्यात भक्ष ठेवण्यासाठी जात असताना त्यांना पिंजऱ्याचा खटका पडल्याचा जोराचा आवाज ऐकू आला.आवाजाने सावध होऊन ते इतर साथीदारांसह दक्षता घेत पिंजऱ्याच्या जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या पिंजऱ्यात अडकला असून जोर जोरात धड़का देत असल्याचे दिसून आले.
पिंजऱ्यात भक्ष ठेवण्यापूर्वीच बिबट्या
पिंजऱ्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ असावी. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम पत्रकार सुखदेव फुलारी यांना बिबट्या अडकल्याची माहिती दिली. श्री.फुलारी यांनी तत्काळ वनपाल वैभव गाडवे , वनरक्षक स्वप्नाली मडके यांचेशी संपर्क साधून याबाबत कळविले.त्यानंतर वनपाल वैभव गाडवे यांनी वन विभागाचे कर्मचारी व वाहन पाठवून रात्री १२ वाजेच्या सुमारास बिबट्याची देवगांव येथून नगर येथील मुख्यालयाकडे रवानगी केली.दि.२४ रोजी त्याला जुन्नर तालक्यातील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात पाठविले जाणार असल्याचे वनपाल श्री. गाडवे यांनी दिली.
या मोहिमेत वनरक्षक राहुल शिसोदे,
वनरक्षक स्वप्नाली मडके,दामोदर धुळे,
वनकर्मचारी सयाजी मोरे, ज्ञानदेव गाडे, शेतकरी बाळासाहेब वाघ, गोविंद देवतरसे,बाळासाहेब जाधव, श्रीकांत ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे, गणेश आगळे सहभागी झाले होते.
दरम्यान पकडलेला हा बिबट एक वर्षे वयाचा असून याच परिसरात आणखी एक मादी व एक बछडा असून त्याला पकडण्याकरिता पुन्हा पिंजरा लावावा तसेच बिबट्याकरिता लावण्यात येत असलेल्या पिंजरा वहातुक खर्च शेतकऱ्यांच्या वर्गणी मधून न करता तो वनविभागाने करावा अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.