नेवासा
हार्वेस्टरसाह्याने गव्हाची सोगणी तथा काढणी केल्यानंतर शेतामध्ये गव्हाचा काड शिल्लक राहतो,तो गव्हाचा काड जाळू नका असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी केले आहे.
यबाबद अधिक माहिती देताना डॉ. ढगे म्हणाले की, रब्बी हंगाम संपत आल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात गव्हाची सोंगणी तथा काढणे मोठ्या प्रमाणात चालू आहे. शेतकरी यासाठी हार्वेस्टर यंत्राचा उपयोग करत आहेत. हार्वेस्टर यंत्रामुळे वेळेची बचत होते खर्च कमी लागतो व मजुरांच्या त्रासापासून सुटका होते अशी सर्वसाधारण अभिप्राय शेतकरी देत आहे. गव्हाच्या हार्वेस्टर साह्याने सोगणी तथा काढणी केल्यानंतर शेतामध्ये गव्हाचा काड शिल्लक राहतो बहुतेक शेतकरी हा गव्हाचा काड जाळून टाकत आहेत. गव्हाचा काड हे सेंद्रिय पदार्थ आहेत, ते जमिनीत गाडल्यास जमिनीची सुपीकता वाढते व उत्पादन विविध पिकांचे वाढण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा आहे दिवसेंदिवस जमिनीत सेंद्रिय पदार्थ कमी होत आहेत. तसेच जाळ केल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणू जळून जातात व त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो त्यासाठी शेतकरी बंधूंनी गव्हाचा काड जाळू नये, तो शेतातील जमिनीत गाढावा असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले आहे.