नेवासा
शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आई-वडिलांनी आपल्या मुलांवर आपले म्हणणे लादु नये. मुलांना त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण करू द्यावा तसेच कौशल्य शिक्षणावर भर द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कारभारी गरड यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील डॉ.निकिता किसन यादव व डॉ.ज्ञानेश्वरी अशोक पंडित यांनी एमबीबीएस परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविल्याबद्दल, तसेच राहुल जावळे यांची सावता परिषद प्रदेश महासचिव पदी निवडीबद्दल संत शिरोमणी सावता महाराज सेवा मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला,त्यावेळी अध्यक्षस्थाना वरून श्री. गरड बोलत होते.
भेंडा-जेऊर रस्त्यावरील संत सावता मंदिर निर्माणस्थळावर झालेल्या कार्यक्रमास शिवाजी फुलारी, किसन यादव, अशोक पंडीत, ज्ञानदेव पुंड
यांचेसह संत सावता मंडळाचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
डॉ.निकिता यादव,अशोक पंडित, राहुल जावळे आदिनी मनोगत व्यक्त केले.
संदीप फुलारी यांनी प्रास्ताविक केले.पूजा विजय फुलारी हिने सूत्रसंचालन केले. प्रदीप फुलारी यांनी आभार मानले.