नेवासा
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयातील ३ विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी तर २ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन रिसोर्स स भारत सरकार दिल्ली यांचे मार्फत ही परीक्षा घेण्यात येते.आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दरमहा १००० रुपये प्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये म्हणजे या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत प्रत्येकी ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सार्थक राजेंद्र पुंड,सार्थक रामदास घुले ,प्रसाद अंबादास शिरसाट हे तीन विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत.
*सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी…
तसेच विद्यालयातील कृष्णा गणेश कोठुळे , कु.आकांक्षा अमोल खाटीक हे दोन विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. त्यांना ४ वर्षासाठी ४० हजार रुपये मिळणार आहेत.
संस्थेचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील, सरपंच स्वप्नाली शिरसागर, उपसरपंच रेखा घुले, सोसायटीचे अध्यक्ष सचिन क्षीरसागर, उपाध्यक्ष बाबासाहेब नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक सावता गायकवाड ,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग ,पालक व ग्रामस्थ यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.