नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील पत्रकार रविंद्र सरोदे-सुर्यवंशी यांना देडगाव(ता.नेवासा) येथील मन्वंतर सामाजिक संस्थेचा मन्वंतर आदर्श पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
देडगाव येथील मन्वंतर सामाजिक संस्था सन २००६ पासून शेतक-यांचे प्रश्न,मजुरांच्या मुलांचे शिक्षण, अपंगाचे कल्याण व महिला सक्षमीकरण करीता काम करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय कदम व निवड समितीने या पुरस्काराची घोषणा केली असून शुक्रवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता देडगाव येथील तक्षशिला कनिष्ठ महाविद्यालयात पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार सोहळ्यात आदर्श पत्रकारिता बरोबर आदर्श शिक्षक व आदर्श दिव्यांग स्नेही हे अन्य दोन पुरस्कारांचे वितरण होणार आहे.