नेवासा
ग्रामीण भागातील नवोदित लेखक विश्वनाथ शिंदे यांच्या “वाघीण” या इंग्रजी-मराठी संभाषण पुस्तकाचे प्रकाशन
करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे जिल्हा परिषद शाळेत आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड व कृषी शास्र डॉ.अशोकराव ढगे यांच्या हस्ते वाघिणी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना आ.विठ्ठलराव लंघे म्हणाले की, विश्वनाथ शिंदे हे प्रगतशील शेतकरी आहेत. ते क्रिकेटचे अष्टपैलू खेळाडू सारखे आहेत. ते राजकारण , समाजकारण, अर्थकारण , बागायती अशा कोणत्याही क्षेत्रात चौकोनी चिऱ्याप्रमाणे आहेत.आता त्यांनी लेखन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकले आहे. या नवोदित लेखकास शक्य तेवढी मदत करू.
गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड म्हणाले की, या पुस्तकामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर होईल. महाराष्ट्र शासनाने २००० पासून इयत्ता पहिली पासून इंग्रजी शिकवण्यास प्रारंभ केला. आता बहुतेक शाळा सेमी इंग्रजीचा अध्यापन करत आहे.
डॉ.ढगे म्हणाले,हे पुस्तक प्राथमिक शिक्षकांना व चिमुकल्या विद्यार्थ्यांना निश्चितच मार्गदर्शक आहे, पुस्तकातील फोटो अत्यंत सुंदर असून भाषांतर व वापरलेला कागद उत्कृष्ट प्रतीचा आहे. आज खऱ्या अर्थाने “शेतकरी लेखक झाला” याचा मनापासून आनंद व अभिमान वाटतो.
लेखक विश्वनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या मनामध्ये शिक्षणापासून वंचित राहिल्याबद्दल खंत होती विशेषतः इंग्रजीचे शिक्षण बालपणी मिळाले नाही त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिले त्यामुळे अत्यंत चिमुकल्यां विद्यार्थ्यांसाठी मी या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
सुनील वाघमारे, साहित्यिक सत्येंद्र तेलतुंबडे,पुरुषोत्तम सर्जे,डॉ. प्रभाकर धिरडे,नवनाथ महाराज इंगळे, विनोद ढोकणे, जनार्धन पाटील हारदे, प्रा.रामकृष्ण नवले , संभाजीराव पाडळे, दादाभाऊ निकम, दत्तात्रय पोटे, ग्रामसेवक श्री. डेंगळे, अशोक शिंदे, गंगाधर भुजंग,कारभारी खामकर ,पांडुरंग काळे संजय खरे, योगेश बर्डे, भारत ढोकणे , सुनील लोंढे, अशोक लांडगे, गणेश लंघे, सुनील भालेराव , दत्तात्रय आगळे सोमनाथ दातीर ,सुनील भालेराव ,अप्पासाहेब विधाटे, संभाजी झगडे, गजानन कपिले ,मोहन विधाटे, सचिन टाक, , गणेश बोरुडे, कैलास कचरे , अमित चव्हाण, ज्ञानेश्वर खंडागळे , गोरख दराडे ,शुभम शिंदे, सर्व श्रीमती मीना शिंदे,आरती शिंदे, सुनिता ननवरे, अश्विनी कल्हापुरे यांचे सह शिक्षक, शिक्षिका ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते.
रामेश्वर शिंदे यांनी प्रस्ताविक केले.संजय खरे यांनी सूत्रसंचालन केले.करण शिंदे यांनी आभार मानले.