नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील स्वागत हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा अजय रामा फुलमाळी यांने आपला प्रामाणिकपणा दाखवत हॉटेलमध्ये सापडलेले ५ हजार रुपये गोशाळेला दान केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबद अधिक माहिती अशी की,अजय रामा फुलमाळी हा मुलगा स्वागत हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो.आठ-दहा दिवसा पूर्वी हॉटेलची स्वच्छता करत असताना त्याला टेबल खाली रोख ५ हजार रुपये सापडले. त्याने ती रक्कम प्रामाणिकपणे हॉटेल मालक सुनील गव्हाणे यांचे कडे सुपूर्द केली. श्री.गव्हाणे यांनी ही रक्कम सापडल्याचे सर्वांना सांगितले,कोणी तरी पैसे घेण्यासाठी येईल म्हणून १० दिवस वाट पाहिली,मात्र कोणीच न आल्याने ती रक्कम अजय फुलमाळी याचे हस्ते नागेबाबा गोशाळेला चारा-पाण्यासाठी दान केली.
यावेळी अजित रसाळ, शाखाधिकारी संतोष साप्ते,पत्रकार सुखदेव फुलारी, सुनील गव्हाणे आदी उपस्थित होते.
अजय फुलमाळी याच्या प्रामाणिकपणा बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.