गुहा वार्ताहर: राहुल कोळसे:राहुरी तालुक्यातील गुहा येथे आज 5 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प तुकाराम महाराज उंबरेकर ,वै.ह.भ.प. केशव महाराज शिंदे,वै .ह.भ.प भगवान महाराज कोळसे,वै.ह.भ.प. एकनाथ महाराज निर्मळ यांच्या कृपाशीर्वादाने व हे.भ.प मिराबाई महाराज मिरीकर,ह.भ.प भाग्यवान गुरूजी,.ह.भ.प भास्कर महाराज पागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी 5 एप्रिल पासून पहाटे 4 वाजता काकडा भजन, सकाळी 7 ते 12 वेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, रात्री 9 ते 11 यावेळेत किर्तन होणार आहे. आज शनिवार ह.भ.प सुनिल महाजन राऊत, रविवारी सकाळी श्रीराम नवमी निमित्ताने सकाळी ह.भ.प संजय महाराज म्हसे तर सायंकाळी ह.भ.प सांळुके महाराज, सोमवारी ह.भ.प रोहिणीताई कारले, मंगळवारी ह.भ.प शुभम महाराज कांडेकर, बुधवारी ह.भ.प संकेत महाराज गांडुळे, गुरुवारी नवनाथ महाराज म्हस्के, शुक्रवारी ह.भ.प अर्जुन महाराज तनपुरे व शनिवारी सकाळी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काल्याचे किर्तन किशोर महाराज जाधव यांचे होणार आहे त्यानंतर साप्ताहाची सांगता होणार आहे.
दररोज किर्तनानतंर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहसाठी गावातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सप्ताह कामिटीच्या वतीने करण्यात आले आहे.