नेवासा
नेवासा येथील पत्रकार सुधीर चव्हाण यांना संत विचार व धर्मकार्य प्रचार प्रसारासाठी देत असलेल्या आध्यात्मिक योगदानाबद्दल सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवज महाराज मंडलिक नेवासेकर व श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते “संत विचार व धर्म प्रचार कार्यगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील मुकींदपूर शिवारातील रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये झालेल्या कार्यक्रमप्रसंगी संत विचार व धर्म प्रचारकार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य, साध्वी दुर्गा दिदी, प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाच्या राजयोगिनी वंदना दिदी, भागवत कथाकार अंकुश महाराज कानडे, ज्ञानेश्वर महाराज हजारे, राम महाराज काळे, कृषी आयुक्त प्रशांत गवळी, प्रकाश शेटे, डॉ.अर्जुन सुसे, डॉ. संदीप कडू, उद्योजक विलास नांगरे, संजय गायकवाड यांच्यासह हजारो भाविक यावेळी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल पत्रकार सुधीर चव्हाण याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे