नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीक्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिरात साजरी करण्यात येणाऱ्या हनुमान जन्मोत्सव सोहळया निमित्त किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भेंडा येथील पावन दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान
जन्मोत्सव नियोजनाची बैठक दि.२९ मार्च रोजी सांय.६ वाजता पार पडली. या बैठकीत अधिक माहिती देतांना श्रीराम सेवक बापूसाहेब नजन यांनी सांगितले की, श्रीसंत नागेबाबांच्या पावन भुमीत मंहत भास्करगिरीजी महाराज, गुरूवर्य मिराबाई महाराज मिरीकर , महंत सुनिलगिरी महाराज यांच्या प्रेरणेने दक्षिण मुखी हनुमान मंदिरात दि.८ ते १२ एप्रिल या कालावधीत
भव्य हनुमान जयंती उत्सव होत आहे.
त्यानिमित्त मंगळवार दि. ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता लक्ष्मण महाराज नांगरे (श्री क्षेत्र बहीरवाडी), बुधवार दि. ९
एप्रिल रोजी सायं ७ वाजता वेदशास्त्र संपन्न प्रविण महाराज गोसावी (श्री एकनाथ महाराज वंशज, श्री क्षेत्र पैठण),
गुरुवार दि. १० एप्रिल रोजी सायं ७ वाजता भागवताचार्य म्हातारदेव महाराज आठरे (केळवंडी), शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सायं ७ वाजता रामायनाचार्य सोमेश्वर महाराज गवळी (वैष्णव सेवा आश्रम, बहऱ्हाणपुर), शनिवार दि. १२
एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त
सकाळी ५ वाजता ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचे हस्ते श्रींचा सुर्योदय पंचामृत महाअभिषेक व जन्मोत्सव सोहळा,सकाळी ८:३० वाजता महंत बालयोगी अमोलजी महाराज (श्रीराम संस्थान वाकोडी, अहिल्यानगर) यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल.तसेच दि.८ते ११ दररोज सकाळी ९ ते १० रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा पाठ, रामनाम जप होईल.दररोज सांयकाळी कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे.
यानिमित्त हनुमान मंदिर परिसर स्वच्छता , अन्नदान व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ,महिला भाविकांची सुरक्षा,लाईट व्यवस्था यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाने केले आहे.
या बैठकीला भाऊसाहेब फुलारी, बाजार समितीचे संचालक संतोष मिसाळ, किशोर मिसाळ,वाल्मीक लिंगायत, विश्वास कोकणे, संतोष मिसाळ, राजू तागड,गणेश महाराज चौधरी, श्रीकांत शिंदे, तात्या फुलमाली, अशोक लोहकरे, चांगदेव जगताप, रमेश मिसाळ, केशव पंडित,रमेश आरणे, विलास फुलमाळी आदी उपस्थित होते.वाल्मीक लिंगायत यांनी आभार मानले.