Friday, March 20, 2026

म.फुले जयंतीनिमित्त व्याख्यान व कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील जाणता राजा ग्रुप, सावता परिषद, समता परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता युवा समाज प्रबोधनकार वसंत हांकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान व कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुनिल गर्जे व. समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जावळे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील साईश्रध्दा लॉन्स मध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान महंत वेदांताचार्य गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के व जागृत शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी महंत श्री आवेराजजी महाराज यांचे शुभहस्ते कार्यगौरव पुरस्काराचे वितरण होणार आहे.
माजी मंत्री शंकरराव गडाख,आमदार विठ्ठलराव लंघे,माजी आमदार पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे,पोलीस निरिक्षक धनंजय जाधव,समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,विभागिय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड,रावसाहेब जावळे,आनंदवन ससंस्थेचे अध्यक्ष उदय पालवे,सावता परिषद प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे,महाराष्ट्र प्रभारी मयुर वैद्य,कॉ.बाबा आरगडे,कडुभाऊ काळे,आदित्य दहिवाळ, सरपंच सौ.लताताई अभंग,
सौ. स्वप्नाली क्षिरसागर यांचे प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
समता परिषदेचे उपाध्यक्ष राहुल जावळे,अमोल अभंग,जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा.सुनिल गर्जे यांनी केले आहे.

*कार्यगौरव पुरस्काराचे मानकरी…*
माजी आ. पांडुरंग अभंग (सहकार),
कल्याणकाका आखाडे (सामाजिक),
सरिताताई मुंडे (महसुल),रंजनाताई बेल्हेकर (शैक्षणिक), शरद आरगडे (सरपंच),डॉ. कैलास कानडे (वैद्यकिय), भाऊसाहेब सावंत (साहित्य), मनोज हुलजुते (उद्योजक),तुकाराम कल्हापुरे
(कृषी), चंद्रहास गवळी(समाजप्रबोधन),
आंनदवन-सोनई (सेवाभावी संस्था).

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!