Tuesday, March 31, 2026

भेंडयाच्या शंकर गदाई ला छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील प्रो-कबड्डी खेळाडू शंकर भीमराज गदाई याला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून देण्यात येणाऱ्या सन २०२३-२४ चा छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाला आहे. तीन लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि.१५ एप्रिल रोजी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२३-२४ घोषित केले आहेत. शुक्रवार दि. १८ एप्रिल रोजी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे यांचे उपस्थित वितरण करण्यात येणार आहे.

*शंकर गदाई- शेतमजूर ते प्रो-कबड्डी*

शालेय व महाविद्यालयीन घेत असताना शेतमजूर म्हणून काम करून ३०० रुपये कमवत असणारा आणि महाविद्यालयाकरिता इयत्ता ७ वी पासून बकबड्डी खेळणाऱ्या शंकर गदाई याचा प्रो-कबड्डी लीग (पीकेएल) मध्ये व्यावसायिक खेळाडू होण्यापर्यंतचा खडतर प्रवास आहे. प्रो-कबड्डी मध्ये शंकर ने तेलगु टायटन ,गुजरात संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २०२३ मध्ये तेलुगु टाइटंस ने शंकर साठी १५ लाख ६१ हजार रूपयांची बोली लावली होती तर २०२४ मध्ये गुजरात संघाने ३० लाख रूपयांची बोली लावली होती.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!