नेवासा
नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद आरगडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरंपच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सौंदाळा गावाने केलेल्या शिवी बंदी ठरावाची राज्यात जनजागृती करू असे आश्वासन सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिले.
सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली
सौदाळा ग्रामपंचायतीने शिव्या बंदीचा ठराव करून ५०० रुपये दंडाची तरतूद केली, विधवा सन्मान योजना सूरु केली,दीपावलीला प्रत्येक कुटुंबात मानसी दीड किलो मोफत साखर वाटप,गावातील मुलीच्या विवाहात कन्यादान योजने अंतर्गत ५ हजार रुपये,विधवा महिलांना रक्षाबंधन व भाऊबीज निमित्त १ हजार रुपये,विधवा पुनर्विवाह साठी ११ हजार रुपये,अनाथ कुटुंबास २ वेळेचे मोफत जेवण, ५ रुपयात २० लिटर थंड व शुद्ध आरो प्लांटचे पाणी,संपूर्ण गाव cctv च्या नियंत्रणाच्या खाली,१ रुपये किलो प्रमाणे धान्य दळून देणे,अपंग व्यक्तीना दरवर्षी साहित्य व रोख निधी या सारखे लोकउपयोगी उपक्रम राबविले जात आहे.
श्री.आरगडे यांच्या कार्याची दखल घेत सरपंच सेवा संघाने त्यांना सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श सरंपच पुरस्कार देवून सन्मानित केले.नगर येथील माउली सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे हे उपस्थित होते.
*शिवी बंदी ठरावाची राज्यात जनजागृती करू-मकरंद अनासपुरे
सौंदाळा गावचे आदर्श सरपंच श्री शरद आरगडे, हरिभाऊ आरगडे,गणेश आरगडे यांनी सिने अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संचालक मकरंद अनासपुरे यांची भेट घेवून गावात राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विविध योजनांची माहिती दिली. त्यावर बोलताना श्री.अनासपुरे यांनी शिवी बंदी ठरावाचे कौतुक करून मी पण राज्यात या ठरावा विषयी जनजागृती करून सौंदाळा गावातील आणखी योजना राबविण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या वतीने मदत करेल असे आश्वासन दिले.