नेवासा
रस्ता अपघातात जखमी झालेल्या।श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या सभासदाला नागेबाबा सभासद सुरक्षाकवच योजनेअंतर्गत दवाखाना उपचार खर्चाची रक्कम 3 लाख 20 हजार 100 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याबाबद अधिक माहिती अशी की, श्री.संत नागेबाबा मल्टीस्टेट वडाळा शाखेतील खातेदार नयन धनंजय मोटे यांन नागेबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून चालू केलेल्या नागेबाबा सभासद सुरक्षा कवच योजनेमध्ये 1500 रुपये भरून नाव नोंदणी केलेली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा रस्ता अपघात झाला. दवाखाना उपचारासाठी त्यांचा 3 लाख 20 हजार 100 रुपये खर्च झाला. विमा क्लेम अंतर्गत मंजूर झालेली सदर रकमेचा धनादेश मदत युवा उद्योजक महेश मोटे, ग्रामसेवक सतीश मोटे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मोटे यांचे हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी नागेबाबा मल्टीस्टेटचे क्षेत्रीय विकास अधिकारी एकनाथ नांदे, वडाळा शाखेचे शाखाधिकारी जीवन आगळे व सर्व कर्मचारी नागेबाबा मल्टीस्टेट वडाळा शाखेचे खातेदार व कायगावचे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.