Friday, February 13, 2026

नेवासातील अवैध वाळु वाहतुकीवर एलसीबीची कारवाई;तीन ब्रास वाळुसह डंपर जप्त

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा येथे वाळुची अवैध वाहतुक करणाऱ्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपीकडुन 3 ब्रास वाळु व डंपर सह 10 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबद अधिक माहितीबअशी की, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप दरंदले, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे यांचे पथक तयार करुन अवैध वाळु उपसा करुन वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेकामी सुचना देवुन पथकास रवाना केले.
सदर पथक हे दि. 16 रोजी रात्री नेवासा तालुक्यामध्ये अवैध वाळु उपसा करुन वाहतुक करणारे इसमांची व वाहनांची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत, खडकाफाटा ते नेवासा गावचे दिशेने जाणारे रोडवरुन एक विनाक्रमांकाचा पिवळा व पांढरे रंगाचा डंपर मधुन वाळुची चोरुन वाहतुक होणार असलेबाबत पथकास माहिती मिळाली. पथकातील पोलीस अंमलदार यांनी तात्काळ खडका फाटा ते नेवासा गावात जाणारे रोडलगत असलेल्या ऑईल मिलजवळील ओढ्याजवळ सापळा रचुन थांबले असता रात्री 02:00 वाजेचे सुमारास पिवळे व पांढरे रंगाचा डंपर भरधाव वेगात येतांना दिसला. पथकातील अंमलदार यांनी सदर डंपर चालकास थांबवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रविण पोपट आढागळे (वय 27 वर्षे), रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमाचे ताब्यातील डंपरची पाहणी केली असता त्यामध्ये वाळु मिळुन आल्याने सदर वाळु वाहतुकीचा परवाना आहे काय याबाबत विचारपुस करता त्याने त्याचेकडे वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. ताब्यातील इसमास डंपर मालकाबाबत विचारपुस करता त्याने सदर डंपरचा मालक राहुल थोरात (पुर्ण नांव गांव माहित नाही) रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हा असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमाकडुन 10 लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा डंपर व 30 हजार रुपये किमतीची 3 ब्रास वाळु असा एकुण 10 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पथकातील पोना संदीप संजय दरंदले अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन इसम नामे प्रविण पोपट आढागळे (वय 27 वर्षे), रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, राहुल थोरात (पुर्ण नांव गांव माहित नाही) रा. खलालपिंप्री, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर (फरार) यांचेविरुध्द नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. 376/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अंमलदार व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!