नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भेंडा फॅक्टरी या शाळेचे माजी मुख्याध्यापक, केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख व जेष्ठ शिक्षक नेते पावलस गोर्डे यांचा सेवापूर्ती समारंभ भेंडा फॅक्टरी शाळेच्या प्रांगणात मोठया उत्साहात संपन्न झाला.
युवा नेते उदयन गडाख यांनी पावलस गोर्डे सर यांनी यापुढे सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.यासाठी त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सोपवली जाईल असे सांगितले.
भेंडा येथे शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष बबनराव गाडेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सेवापूर्ती कार्यक्रमास युवानेते उदयनदादा गडाख,संजय सुखधान,
काशिनाथ अण्णा नवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उदयन गडाख,काशिनाथ नवले, बापूसाहेब नजन, मुख्याध्यापक माणिक जगताप,बाळासाहेब झावरे, रामेश्वर चोपडे, मिराताई केदार, बाळासाहेब गायकवाड, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त येशुदास गोर्डे, रविंद्र कडू, केंद्रप्रमुख अड.निर्गम मोकळ, सुनिल गायकवाड आदींची यावेळी भाषणे झाली. यावेळी बोलताना उपस्थित सर्व मान्यवरांनी शिक्षक पावलस गोर्डे यांचा शांत-संयमी स्वभाव, शाळेच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ व कष्ट यांचा उल्लेख केला. तसेच त्यांच्या पत्नी उषाताई गोर्डे यांच्याकडे नेवासा पंचायत समिती सभापती पद असताना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. त्यांच्या सेवारंभी जिजामाता माध्यमिक विद्यालयामध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचा आपल्या भाषणामध्ये गौरव केला. भेंडा फॅक्टरी शाळेची पीएमश्री या योजनेत झालेली निवड व त्यामाध्यमातून त्यांनी शाळेचा केलेला कायापालट या सर्व गोष्टींचा उल्लेख सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये केला .
आपल्या मनोगतामध्ये शिक्षक पावलस गोर्डे यांनी सुद्धा भावूक होत गावासाठी मी आपली सेवा करण्यास सदैव तत्पर राहील असे सांगत आज पर्यंतच्या यशामध्ये ज्यांनी ज्यांनी आपणास मदत केली त्या सर्वांचे आभार मानले .
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, दिलीपराव लोखंडे,शंकर भारस्कर, जनार्दन जाधव,बापूसाहेब बहिरट, तुकाराम मिसाळ,अशोकराव मिसाळ, डॉ. शिवाजी शिंदे, भेंडा बुद्रुकच्या सरपंच सुहासिनी मिसाळ,प्रा.उषा मिसाळ,माजी सरपंच सुनिल खरात, ज्येष्ठ समाजसेवक खंडागळे बाबा,भास्कर लिहीणार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप फुलारी,येडूभाऊ सोनवणे, हनीफ शहा, सुनील गोर्डे,योगेश वर्मा,मुसाभाई इनामदार,मायकल गोर्डे, देवेंद्र काळे, दिलीप गोर्डे, दादा गजरे,डॉ. ईश्वर उगले, बाळासाहेब झावरे,नेवासा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड, केंद्रप्रमुख रवींद्र कडू ,सुखदेव सोनवणे, कमल लाटे,मीराताई केदार, सुभानभाई शेख, शिक्षण विस्ताराधिकारी भाऊसाहेब जगताप, शिक्षण विस्तारअधिकारी सुनील जाधव, शिक्षक बँक संचालक कल्याण लवांडे,माजी चेरमन बाळासाहेब कदम, रामेश्वर चोपडे,पांडुरंग काळे, राजेंद्र मुंगसे, संतोष दुसुंगे, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण, गुरुमाऊली मंडळाचे उत्तर विभागीय अध्यक्ष सुखदेव आरोळे, मुख्याध्यापक माणिकराव जगताप, रामचंद्र गजभार ,भाऊसाहेब घोरपडे, विजय झावरे, साहेबराव मले, विजय अंधारे, संतोष भोपे,पोपट घुले, साठे मॅडम, जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्य डॉ.जयश्री सरोदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ.रमेश नवल, प्रा.विनायक तागड,कार्यालयीन अधिक्षक बंडू घोडेचोर, गुरुदास भास्करगिरी विद्यालयाचे प्राचार्य जयराम जाधव, मुक्तानंद विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब सातुरे , बाळासाहेब बोधक, नितीन औताडे व अनेक शिक्षक बांधव व महीला भगिनी ग्रामस्थ शाळांचे मुख्याध्यापक विविध संस्थांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संजय कडूस, शिक्षक संजय थोरात, मंदाकिनी पवार, सुनिता माळशिखरे, ताई गायकवाड ,सुरेखा मंडलिक , विमल देवकर, निलेशा घुणे, सतीश चाबुकस्वार ,कानिफनाथ दौंड ,दत्तात्रय नवगिरे, महेंद्र वडींनकर ,सुरेश तळेकर, ज्ञानेश्वर गोरे, ऋषिकेश गोर्डे मित्र मंडळ ,घटनापती प्रतिष्ठाण यांनी परिश्रम घेतले .
शिक्षिका मनीषा धनापुणे यांनी कार्यक्रम स्थळी रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.
मुख्याध्यापक संजय कडूस यांनी प्रस्ताविक केले. डॉ.रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.संजय थोरात यांनी आभार मानले.
*गोर्डे यांच्यावर योग्य जबाबदारी सोपवू-उदयन गडाख*
युवा नेते उदयन दादा गडाख यांनी पावलस गोर्डे सर यांनी यापुढे सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.यासाठी त्यांच्यावर योग्य ती जबाबदारी सोपवली जाईल असे सांगितले.