Monday, November 10, 2025

विठ्ठल अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कृष्णा गव्हाणे तर उपाध्यक्षपदी संतोष औताडे यांची निवड

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील विठ्ठल अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कृष्णा गव्हाणे तर उपाध्यक्षपदी संतोष औताडे यांची निवड झाली आहे.

श्री विठ्ठल अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नवीन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वाय.एल.नरसिंगपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात सर्वानुमते अध्यक्ष पदी संस्थापक कृष्णा गव्हाणे यांची तर उपाध्यक्ष पदी संतोष औताडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संस्थेचे संचालक सौ.सुनिता गव्हाणे, विजय गव्हाणे,संदिप जावळे,संतोष औताडे, हौशिराम नवले, बाळासाहेब कोलते, सौ.आशा जावळे, सौ.उषा गव्हाणे,संजय गव्हाणे, किशोर वायकर, व्यवस्थापक सुरेश दरवडे,लेखनिक कृष्णा मंडलिक, रोखपाल शुभम आढागळे उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!