Sunday, November 16, 2025

शिक्षिका मनिषा कावरे नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मनिषा एकनाथ कावरे यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या वतीने नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
नगर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात शिक्षिका मनिषा कावरे यांना ज्येष्ठ कवी व साहित्यिक अशोक नायगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक संघटनेचे राज्य नेते रावसाहेब रोहकले, जेष्ठ साहित्यिक संजय कळमकर, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा जयश्रीताई झरेकर ,जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे ,शिक्षक बँकेचे माजी संचालक राजेंद्र मुंगसे, भारत गवळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्रीमती कावरे या गेल्या वीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पाथरवाला ,अंतरवाली आणि नजिक चिंचोली अशा शाळांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सहशालेय उपक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी त्या करून घेत आहेत. या शाळेतील अनेक विद्यार्थी एनएमएमएस परीक्षा,स्कॉलरशिप परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेले आहेत. क्रीडा स्पर्धेतही या शाळेने तालुकास्तर,जिल्हास्तरावर यश मिळवले आहे. गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती कर्डिले,सरपंच-उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व तालुक्यातील सर्व शिक्षकांनी कावरे यांचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!