Friday, February 13, 2026

गोंडेगावच्या जनकल्याण फाउंडेशनचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार जाहीर

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील गोडेगांव जनकल्याण फाउंडेशनचे सन २०२५ चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे बुधवार दि.३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कॉम.सुभाष लांडे यांचे हस्ते व आमदार विठ्ठलराव लंघे यांचे अध्यक्षतेखाली व सामाजिक कार्यकर्ते कॉ.बाबा आरगडे यांचे प्रमुख उपस्थितीत जनकल्याण फाउंडेशनचे संत तुकडोजी महाराज पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली.

*समाजभूषण पुरस्कारार्थी…

जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले (सामाजिक), प्रकाश विठ्ठल खंडागळे (साहित्य), आरोग्य सेविका श्रीमती ज्योती रमेश तोडमल (आरोग्य सेवा), प्रविण अशोकराव रोकडे (कृषिभुषण),अविनाश गोपाळकृष्ण मंत्री (पत्रकारीता), परिवहन अधिकारी कु.राणी बाबुराव सोनवणे (समाजभुषण).

*विशेष पुरस्कारार्थी:–
अभिनेता किरण ज्ञानदेव बेरड (कलावंत), रमेश राजाबापु गुणवंत(ग्रंथपाल), प्रमोद त्रिंबक गजभार (आदर्श सरपंच).

*कविवर्य पुरस्कारार्थी:– कवी निवृत्ती रघुनाथ कानवडे (निमगांव पागा, ता. संगमनेर), कवी बाळासाहेब आंद्रेश मुंतोडे (चिंचाळे,ता. राहुरी),कवी आत्माराम रामदास शेवाळे (वाघोली,ता.शेवगांव),कवी विजयकुमार रामराव पांचाळ (बेटसांगवी,ता.लोहा), कवी सौ. सुनिता गोविंद कपाळे-ओहोळेकर (छ.संभाजीनगर).

*गुणवत्ता सत्कारमुर्ती:–
पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अजिंक्य कैलास धानापुने, संदिप गणपत साळवे, प्रतिक मधुकर घाडगे,कु. राणी केशव जाधव या गुणवंतांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

बुधवार दि.३० रोजी दुपारी ४ वाजता आयोजित कवी संम्मेलन व ६:३० वाजाता पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवाहन
जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे,सुरेश रोडगे व रामदास नजन यांनी केले आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!