Monday, May 19, 2025

अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून शनिदेवाला अभिषेक

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी पती राज कुंद्रा व परिवारासह शनिशिंगणापूरला भेट देऊन उदासी महाराज मठात अभिषेक केला.

शुक्रवार दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता शेट्टी व कुंद्रा परिवाराच्या ग्रे रंगाची व्हॅनेटी व्हॅनने थेट मंदिरात प्रवेश केला. उदासी महाराज मठात शिल्पा व राज यांनी संकल्प सोडून नंतर अभिषेक केला. चौथऱ्यावर जाऊन दोघांनी मूर्तीवर तेल अर्पण केले. विशाल कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.

जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे विश्वस्त दीपक दरंदले व माजी विश्वस्त सयाराम बानकर यांनी शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार केला. यावेळी शिल्पाची आई सुनंदा शेट्टी व राज कुंद्राची बहीण रिना कुंद्रा उपस्थित होते.

चौथरा व मंदिर परिसरात चाहत्यांनी सेल्फी घेण्यासाठी व हस्तांदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सुरक्षारक्षकांना गर्दी आवरण्यासाठी कसरत करावी लागली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!