Sunday, June 1, 2025

नेवासा पोलीसांची सिनेस्टाइल कारवाई; पाठलाग करून ट्रॅक्टर चोरांना पकडले

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील बकुपिंपळगांव येथील ट्रॅक्टर चोरीतील आरोपीना नेवासा पोलीसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन २४ तासात केले जेरबंद केले.

यबाबद अधिक माहिती अशी की, नेवासा पोलीस स्टेशन हददीत मौजे बकुपिंपळगांव. ता. नेवासा या ठिकाणी दि. २७ मे रोजी रात्री १२:२० ते दि.२८ मे चे सकाळी ६ वाजेचे दरम्यान गणेश पोपट शिंदे (वय ३२ वर्षे) रा. बकुपिंपळगांव, ता नेवासा यांचे घरा समोरुन पत्राचे शेडमधुन स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केले बाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम. ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता प्रभारी अधिकारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सदर गुन्हयांचे बाबत मार्गदर्शन करुन रवाना केले.
गुन्हे शोध पथक हे आरोपीचा तांत्रिक विश्लेषण, खब-यामार्फत शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदर चोरी झालेला ट्रॅक्टर हा विक्री करण्यासाठी प्रवरासंगम परिसरात येणार आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथक यांनी प्रवरासंगम परिसरात सापळा लावला असता रात्री ९ वाजेचे सुमारास सदर स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर हा एका टाटा एसी कंपनीच्या मालवाहु गाडीमध्ये असल्याचे निर्देशनास आले. सदर टाटा एसी कंपनीची मालवाहु चारचाकी गाडी ही पोलीसांची चाहुल लागताच प्रवरासंगम वरुन सिध्देश्वर मार्गे पळुन गेली. सदर गाडीचा गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन सिध्देश्वर, गोधेगांव, भालगांव शिवारात पकडली. गाडीमधील इसम यांना पोसई विकास पाटील यांनी नाव, गाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मयुर संजय भोसले (वय २० वर्षे) रा. कासारवाडी. ता. पाथर्डी, महेश ज्ञानेश्वर मुजमुले (वय २० वर्षे) रा. जवखेडे,ता. पाथर्डी, महेश अशोक बारुडे (वय २७ वर्षे) रा. प्रवरासंगम ता नेवासा, रविंद्र मारकस मोरे (वय २४ वर्षे) रा. बकुपिंपळगांव. ता. नेवासा, प्रणव कृष्णा पवार (वय २२ वर्षे) रा.प्रवरासंगम ता. नेवासा, दुर्गेश बाबासाहेब बेडकर (वय १९ वर्षे) रा.प्रवरासंगम, ता नेवासा असे सांगुन सदर टाटा एसी कंपनीची मालवाहु चारचाकी गाडीचे पाठीमागील हौदयामध्ये असलेल्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर ट्रॅक्टर हा नमुद गुन्हयांतील फिर्यादी यांचे घरासमोरील पत्राचे शेडमधुन चोरी केले बाबत कबुली दिली.
सदर स्वराज कंपनीचा एम एच १७ सीएक्स ७३५६ किंमत अंदाजे २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर तसेच टाटा एसी कंपनीची गाडी नं एमएच १६ सीडी ४९४४ किंमत अंदाजे ४ लाख रुपये असे एकुण ६ लाख ६५ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करुन नमुद आरोपी यांना सदर गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली असुन सदर गुन्हांचा पुढील अधिकचा तपास गुन्हे शोध पथकांचे पोसई विकास पाटील हे करत आहेत.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग
वैभव कुलबुर्गे,उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग सुनिल पाटील
यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी संतोष खाडे, पोसई विकास पाटील, पो.हवा. अजय साठे, पो.कॉ आप्पासाहेब तांबे, सुमित करंजकर, अविनाश वैदय, नारायण डमाळे, श्रीनाथ गवळी, राम वैदय, भारत बोडखे, गणेश जाधव सायबर सेल श्रीरामपुर चे पो.हवा. सचिन धनक यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!