Friday, October 22, 2021

निषेध म्हणून नगर जिल्ह्यातून मोदी सरकारला शेणाच्या गोवर्‍या कुरियरने पाठविल्या जाणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अकोले तालुका काँग्रेस च्यावतीने अकोले मध्ये ढोल ताशाच्या गजरात महात्मा फुले चौक ते अकोले बस स्थानकापर्यंत भव्य सायकल, बैलगाडी, हातगाडी रॅली काढण्यात आली.

यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, तालुकाध्यक्ष दादपाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, महिला काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस उत्कर्षाताई रुपवते, रमेशराव जगताप, बाळासाहेब नाईकवाडी, शिवाजी नेहे, ज्ञानेश्‍वर झडे, मदन पथवे, भास्कर दराडे, अमोल नाईकवाडी, अरीफ तांबोळी, संपतराव कानवडे, विक्रम नवले, रामदास धुमाळ,

सुजित नवले, साईनाथ नवले, सचिन जगताप, संदीप पवार, उबेद शेख, सतीश पाचपुते, मंदाताई नवले, शोभाताई निर्गुडे, स्वाती नवले, राधिका नवले, वनिता शेटे, जया झोळेकर, रुपाली पाचपुते, संगीता सापीके आदींसह महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.डॉ.सुधीर तांबे यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला. मोदी सरकारने देशाची बिकट अवस्था करून ठेवली आहे. मोदी हे हुकूमशाही पध्दतीने देश चालवीत असून त्यांचात अहंभाव निर्माण झाला आहे. शेतकरी 8 महिन्यापासून आंदोलन करीत आहे मात्र मोदींना त्यांना भेटायला वेळ नाही. महागाईचा भडका उडाला आहे.

सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाची जबाबदारी म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणार असून त्यांच्यात जनजागृती करून मोदी सरकारचा भांडाफोड करणार असल्याचे डॉ. तांबे म्हणाले.

कुरिअरने शेणाच्या गोवर्‍या पाठविणार –
गॅस दरवाढ ही प्रत्येक घराशी निगडित असून इंधन भाव वाढीमुळे सर्व सामान्य माणसाने कसे जगायचे.महिलांना घर चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे असे प्रदेश सरचिटणीस उत्कर्षाताई रुपवते यांनी सांगितले. मोर्चानंतर महिलांच्या भावना मोदी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांच्या वतीने मोदी सरकारला शेणाच्या गोवर्‍या कुरियरने पाठविल्या जाणार असल्याचे रुपवते यांनी सगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!