नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील प्राथमिक शिक्षिका सौ. सुरेखा अशोक पंडित व आंगणवाडी सेविका सौ. सावित्री विजय शेलार यांना भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार सपरंच सौ.सुहासिनी किशोर मिसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शनिवार दि.३१ रोजी भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाने दर वर्षी
दि.३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत/गटग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन सन्मानित करण्याबाबत शासन निर्णया अन्वये दिलेल्या निर्देशा नुसार भेंडा बुद्रुक गावातील प्राथमिक शिक्षिका सौ.सुरेखा अशोक पंडित व आंगणवाडी सेविका सौ.सावित्री विजय शेलार यांना सरपंच सौ.सुहासिनी मिसाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मान चिन्ह,शाल-श्रीफळ व ५०० रुपये रोख रक्कम देवून ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार
प्रदान करण्यात आला.
गणेश गव्हाणे,अण्णासाहेब गव्हाणे, सुखदेव फुलारी,संतोष मिसाळ, किशोर मिसाळ,डॉ.लहानु मिसाळ, यडूभाऊ सोनवणे,संजय मिसाळ,अशोक पंडित,विजय शेलार,
सतीष शिंदे,धोंडराम भिसे, मच्छिंद्र रोकडे, ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे,बाबासाहेब गोर्डे,रामभाऊ देशमुख, विष्णु फुलारी आदि यावेळी उपस्थित होते.
दादासाहेब गजरे यांनी आभार मानले.