नेवासा
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी नुकतीच कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्रास सदिच्छा भेट देत आरोग्य केंद्राची पाहणी करत समाधान व्यक्त करत तालुका आरोग्य अधिकारी, कुकाणा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे आरोग्य केंद्रात आगमन होताच आरोग्य विभागाचे वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी स्वागत केले तर कुकाणा ग्रामपंचायत व जाणता राजा ग्रुपच्या वतीने अमोल अभंग व ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे यांनी त्यांचा सत्कार केला.
मंत्री बोर्डीकर यांनी कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर संवाद साधला. आरोग्य केंद्राच्या सर्व विभागास भेटी देवून पाहणी करत येथील स्वच्छता व उपलब्ध विविध सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष अड.गणेश निकम, ग्रामपंचायत माजी सदस्य समीर पठाण, काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अभिजीत लुणीया, युनूस नालबंद, शिवसेनेचे राजेंद्र राऊत, जावेद शेख, आरोग्य विभागाच्या अनिता सुर्यवंशी , वैशाली बनसोडे, नीता पोपाळघट, विजय चिलगर यांच्यासह आरोग्य विभागाचे आदी यावेळी उपस्थित होते.