Tuesday, June 17, 2025

महाराष्ट्र अंनिसच्या राज्य अध्यक्षपदी माधव बावगे

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
481894906_9460333617322859_6156576721810500656_n
WhatsApp Image 2025-04-09 at 6.52.29 PM
previous arrow
next arrow
Shadow

शहादा दि. ३१ मे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवारी दि. ३१ मे रोजी दुपारी करण्यात आली असून अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह ५ प्रधान सचिव आणि ७ राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी नेतृत्व करणार आहेत. राज्यभरातून या बैठकीला ४६० कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे.

लोणखेडा (ता.शहादा) येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीच्या दुसऱ्या दिवशी निवड सहमती समितीचे सदस्य माधव बावगे, सुशिला मुंडे, संजय शेंडे यांनी २०२५ ते २०२८ पर्यंतच्या त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणीची निवड जाहिर केली. ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे (लातूर) यांची अध्यक्षपदी व संजय बनसोडे (इस्लामपूर जि.सांगली) राज्य कार्याध्यक्ष पदावर निवड जाहिर करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष पदांवर ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (नाशिक), डॉ.प्रदिप पाटकर (पनवेल), डॉ.अशोक बेलखोले (किनवट ता.नांदेड), संतोष आंबेकर (बुलढाणा), संजय शेंडे (नागपूर), डॉ. रश्मी बोरीकर (संभाजीनगर), शामराव पाटील (इस्लामपूर) यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य प्रधान सचिव म्हणून डॉ.ठकसेन गोराणे (नाशिक), विनायक सावळे (शहादा जि.नंदुरबार), गजेंद्र सुरकार (वर्धा), रुक्साना मुल्ला (लातूर), विजय परब (मुंबई) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकारी समितीत सरचिटणीस म्हणून आरती नाईक (पनवेल), सुरेश बोरसे (शिरपूर जि.धुळे), कृष्णात कोरे (कोल्हापूर), सुधाकर काशीद (सोलापूर), विलास निंबोरकर (गडचिरोली), शहाजी भोसले (छ.संभाजीनगर), उत्तरेश्वर बिराजदार (लातूर) यांचा समावेश आहे.

उर्वरित राज्य कार्यकारीणीत विविध विभागांच्या कार्यवाह व सहकार्यवाह यांची पुढीलप्रमाणे निवड झाली…

*महिला सहभाग:- कार्यवाह अमरावतीच्या गायत्री आडे,सहकार्यवाह मुंबईचे रुपेश शोभा,

*युवा सहभाग:- कार्यवाह पनवेलचे प्रियंका खेडेकर, सहकार्यवाह कोल्हापूरचा हरी आवळे, जोडीदाराची

*विवेकी निवड:- कार्यवाह कोल्हापूरचे रेश्मा खाडे, सहकार्यवाह नागपूर येथील कविता मते,

*जातपंचायत मूठमाती अभियान:- कार्यवाह नाशिकचे कृष्णा चांदगुडे,

*मिश्र विवाह, सत्यशोधकी विवाह:- लातूर येथील रणजित आचार्य

*प्रशिक्षण व्यवस्थापन:- कार्यवाह नंदुरबार येथील किर्तीवर्धन तायडे, सहकार्यवाह वर्धा येथील डॉ. माधुरी झाडे,

*वि.जा. प्रकाशन, वितरण:- कार्यवाह ठाणे येथील प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे,

*मानसिक आरोग्य व्यवस्थापन:- कार्यवाह पनवेल येथील डॉ. अनिल डोंगरे, जळगावचे मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदिप जोशी, सहकार्यवाह बीड येथील अतुल बडवे, जळगावचे विश्वजित चौधरी,

*विज्ञान बोध वाहिनी:- कार्यवाह सांगली जिल्ह्यातील भास्कर सदाकळे, सहकार्यवाह लातूर येथील बाबा हलकुडे,

*विवेक वाहिनी:- कार्यवाह बीड येथील प्राचार्या डॉ. सविता शेटे, सहकार्यवाह परभणी येथील प्राचार्य डॉ. विठ्ठलराव घुले , कागल जि. कोल्हापूर येथील प्रा.डॉ.संतोष जेठीथोर यांचा समावेश आहे.

*सांस्कृतिक अभिव्यक्ती :- कार्यवाह पालघर जिल्ह्यातील अनिल शोभना वसंत, सहकार्यवाह रत्नागिरी येथील सचिन गोवळकर,

*सोशल मिडिया:- कार्यवाह धुळे येथील मनोज बोरसे,

*राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समन्वय:- कार्यवाह नाशिक येथील प्रा.डॉ.सुदेश घोडेराव,
*निधी व्यवस्थापन:- कार्यवाह शिंदखेडाचे प्रा. परेश शाह, सहकार्यवाह ठाण्याचे सुधीर निंबाळकर

*कायदेविषयक व्यवस्थापन:- कार्यवाह पुणे येथील अॅड. मनिषा महाजन, सहकार्यवाह ठाणे येथील अॅड. तृप्ती पाटील, सोलापूरचे अॅड. गोविंद पाटील,

*व्यसनविरोधी प्रबोधन आणि संघर्ष :- कार्यवाह वर्धा येथील सारिका डेहनकर, सहकार्यवाह अंबाजोगाईचे सुधाकर तट,

*संविधान जागर विभाग :- कार्यवाह पुण्याचे अॅड. परिक्रमा खोत,

*सर्वेक्षण आणि संशोधन विभाग:- कार्यवाह नांदेडचे प्रा. डॉ. बालाजी कोंपलवार, सहकार्यवाह अमरावतीचे प्रा. डॉ. हरीश पेटकर,

*दस्तऐवज संकलन:- कार्यवाह नवी मुंबई येथील अशोक निकम, विविध उपक्रम विभागांमध्ये लातूरचे कार्यवाह म्हणून अनिल दरेकर, अंनिप संपादक मंडळात मुख्य संपादक म्हणून सांगली येथील डॉ.नितीन शिंदे, कार्यकारी संपादक पुण्याचे उत्तम जोगदंड सदस्य नांदेडचे डॉ.बाळू दुगडूमवार, नाशिकचे प्रल्हाद मिस्त्री, सांगली जिल्ह्यातील श्यामसुंदर मिरजकर, नाशिकचे राजेंद्र फेगडे, नंदुरबारचा हंसराज महाले, सांगलीचे अजय भालकर यांचा कार्यकारिणीत समावेश आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!