Monday, March 30, 2026

जिजामाता विद्यालयाचे प्राचार्य-उपप्राचार्य यांचा सेवापूर्ती सत्कार

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री मारूतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री सरवदे, उपप्राचार्य शिरीष विधाटे व शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल चावरे हे नियमित वयोमानानुसार निवृत्त झाल्याने
शिक्षण संस्थेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे यांच्या हस्ते त्यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री.वाबळे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात या कर्मचाऱ्यांनी आपला एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्यामुळे शिक्षण संस्थेची प्रतिष्ठा वाढवली.त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांच्यातील क्षमता वाढवण्यास मदत केली .त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर अतिशय प्रभावीपणे मांडले.

प्राचार्या डॉ.जयश्री सरवदे म्हणाल्या, ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत अनेक सहकारी, मार्गदर्शक लाभले. त्याच बरोबर संस्थेचे आभार व्यक्त करत जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद व शाळा सहकारी शालेय परिसर सोडताना दुःख वाटते ही भावना व्यक्त केली.

उपप्राचार्य श्री.विधाटे म्हणाले, ३१ वर्षाच्या सेवेमध्ये सर्वांशी हसून खेळून सेवा केली. प्रियजनांपासून अलिप्त होताना वाईट वाटते.सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ऋणात राहणे पसंत करेन अशा भावना व्यक्त केल्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!