Tuesday, December 16, 2025

श्रीरामपूर रिमांड होम मधिल चाळीस वर्षांपूर्वीचे सवंगडी आले एकत्र

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

श्रीरामपूर/प्रतिनिधी

१९८५ मध्ये श्रीरामपूर येथील रिमांड होम शिकत असलेल्या चाळीस वर्षांपूर्वीचे सवंगडी एकत्रित आले. श्रीरामपूर येथे रिमांड होम मध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून मायेची ऊब देऊन स्नेहमेळावा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

श्रीरामपूर येथील रिमांड होम येथे शिक्षण झालेले नेवासा तालुक्यातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा नेवासा तालुक्यातील माजी विद्यार्थी सखाहरी कोरडे यांच्या संकल्पनेतून रविवार दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी रिमांड होम मध्ये आयोजित करण्यात आला होता.
यावेळी १९८५ सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रिमांड होम येथे गरजू विद्यार्थ्यांना मायेची उब म्हणून ब्लॅंकेटची वाटप करण्यात आले. तसेच मिस्टअन्न भोजनाचाही त्यांना आस्वाद दिला गेला.
नेवासा तालुक्यातील खेडले काजळी येथील रहिवासी व श्रीरामपूर रिमांड होम येथील माजी विद्यार्थी सखाहरी कोरडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन
केले होते.

सखाहरी कोरडे दरवर्षीप्रमाणे स्नेह मेळाव्याचे आयोजन करत असतात. मागील वर्षी त्यांनी हा स्नेहमेळावा शेवगाव तालुका येथे आयोजित केला होता. यावर्षी त्यांनी श्रीरामपूर येथील रिमांड होम मधील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या वर्षीचा सस्नेह मेळावा श्रीरामपूर येथील रिमांडहोम येथे घेण्याचे ठरवले.
त्यांच्या या संकल्पनेला साथ देत रिमांड होम मधील वर्ग मित्रांनी एकत्रित येत हा सस्नेह मेळावा उत्कृष्टपणे संपन्न केला व जुन्या आठवणींना उजाळा देत सर्व माजी विद्यार्थ्यांनी रिमांड होम मधील घालवला व जुन्या आठवणींना उजळा देत आठवणी ताज्या केल्या. श्री.कुलथे सर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रीमांड होमचे माजी शिक्षक श्री.आगळे सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम
आयोजित केला गेला होता.

यावेळी बोलतांना रिमांड होमचे माजी शिक्षक आगळे सर म्हणाले की, सखाहरी कोरडे यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकमेकांना भेटण्याची व बोलण्याची संधी मिळाली, हे सर्व श्रेय सखाहरी कोरडे यांना जाते. सखाहरी कोरडे दरवर्षीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचे काम करतात. हे काम हे त्यांचे पुण्याचे काम असून जुन्या आठवणींना उजाळा देत आम्हालाही तुम्हा विद्यार्थ्यांना पाहून जगण्यासाठी नव ऊर्जा मिळते. उतार वयामध्ये जुन्या विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर नवचैतन्य व जुन्या आठवणींना उजळा आम्हाला मिळतो. आम्हाला नेहमी वाटते की विद्यार्थी हा मोठा होत राहो. आपण सर्वही नेहमी उज्वल भविष्य आपले असावे व आपल्याला दीर्घायुष्य लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आगळे सरांनी बोलताना केली.
आपण सर्व विद्यार्थी हे मोठे मोठे उच्च पदावरती असल्याचे पाहून माझे मन भरून आलेले आहे तसेच मी दिलेली शिकवण आपण सर्वांनी जोपासली यातच माझी शिक्षकी पेशाचे सार्थक झाल्याचे त्यांनी बोलताना सांगितले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा शुभ आशीर्वाद त्यांनी दिले .

सखाहरी कोरडे, वाल्मीक कोरडे, रंगनाथ घारे ,गोरख भगत, बाबासाहेब खराडे, लक्ष्मण बनकर ,सुरेश साळुंके,धर्मा खरात, नानासाहेब अहिरे ,प्रकाश थोरात ,भाऊसाहेब सोलाट, मारुती थोरात ,नानासाहेब चेडे ,शंकर सोनवणे ,अशोक दुधाडे, केशव दुधाडे, परमेश्वर खराडे, प्रभाकर जाटे ,राजेंद्र विखे ,गंगाधर चोळके ,प्रभाकर त्रिभुवन, नंदू गोसावी, नानासाहेब शिंदे, दत्तात्रय काळे ,लाला भाई सय्यद ,इस्माईल भाई शेख, बाबासाहेब जरंगे, माणिक खरात, रामकिसन थोरात आदि यावेळी उपस्थित होते.
सखाहरी कोरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले. बाबासाहेब खराडे यांनी सुत्रसंचालन केले. भाऊसाहेब सोलाट यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!