नेवासा/प्रतिनिधी
ज्येष्ठ सरकारी वकील व सुप्रसिद्ध कायदेतज्ञ,पद्मश्री ॲड.श्री उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल नेवासा मतदार संघाच्या वतीने आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सत्कार करून निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे नेते संभाजीराव दहातोंडे,पांडुरंग दातीर यावेळी उपस्थित होते.
अहिल्यानगर येथील भेटी प्रसंगी कायदे तज्ञ खा. उज्वल निकम यांचा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.खा.अँड.उज्वल निकम यांच्या निवडीने निश्चितच त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाचा देशाला फायदा होणार असून त्यांची राज्य सभेवरील निवड ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून तीर्थक्षेत्र भेटीसाठी तालुक्यात येण्यासाठी निमंत्रित केले.