नेवासा/सुखदेव फुलारी
जमिनीची मशागत, योग्य वाणाची निवड व लागवड पद्धत, खत आणि पाणी व्यवस्थापन करून एकरी ५० हजार ऊस संख्या ठेवली तर एकरी १०० टन ऊस उत्पादन मिळू शकते.मात्र त्यासाठी जमिनीची जैविक,भौतीक व रासायनीक सुपिकता चांगली असावी असे प्रतिपादन ऊस पिक शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी केले.
भेंडा (ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने
सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी नेवासा बुद्रूक येथील सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात ऊस पिक परिसंवाद व शेतकरी मेळावा संपन्न झाला. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना श्री.माने बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर), जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडूरंग अभंग, तज्ञ संचालक डॉ.क्षितीज घुले पाटील,संचालक काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ, बबनराव भुसारी,भाऊसाहेब कांगुणे, अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, मच्छिंद्र म्हस्के, जनार्दन कदम, विष्णुपंत जगदाळे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर, तुकाराम नवले, अड.हिम्मतसिंह देशमुख , कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रविंद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के, मुख्य शेतकी अधिकरी सुरेश आहेर, कृषि विज्ञान केंद्रप्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
*श्री.माने पुढे म्हणाले की, ऊस लागवड करण्यापूर्वी जमिनीची मशागत महत्वाची आहे,सेंद्रिय कर्ब वाढविन्यासाठी हिरवाळीचे खते दयावित. पाण्याचा निचरा व्यवस्थीत होईल याची काळजी घ्यावी. कमीत कमी ४.५ फुट सरी असावी. योग्य ऊस जातीची निवड करावी. को-८६०३२ ही ऊस जात सर्वात उत्तम आहे. तोडणी पर्यंत कांडयाची वाढ होत रहाते,वजन आणि साखर उतरा उत्तम आहे.
दोन टिपरातील अंतर १ फुटापर्यंत ठेवावे, एक डोळा पद्धतीने लागवड केल्यास कमी वयाची रोपे लावावीत. २ रोपा मधील अंतर १.५ ते २ फुट ठेवावे.
दोन सऱ्यातील अंतर जास्त असेल तर सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळतो, आंतरपीक घेता येते, यांत्रिक मशागत करता येते, आच्छादन करता येते, ठिबक सिंचन नळ्यांचा खर्च कमी होतो. ४ फुट सरी अंतरात १० फुटात ५५ ते ६०,५ फुट सरी अंतरात १० फुटात ६५ ते ७० तर ६ फुट सरी अंतरात १० फुटात ७० ते ८० ऊस संख्या असावी.
खत व्यवस्थापन करतांना माती परीक्षण करून आणि जमिनीचा सामु बघून खते दयावीत.१०० टन उसाचे लक्ष गाठण्यासाठी एकरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश द्यावे.खते देतांना ती मातीआड़ करून हलके पाणी द्यावे. जैविक खतांचा वापर करावा. योग्य पद्धतीने तण आणि किडीचे नियंत्रण करावे.
*माजी आमदार नरेंद्र घुले पाटील म्हणाले की शेतकऱ्याच्या शेताला गोदावरी-प्रवरेचे पाणी मिळाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाईपलाईनला कर्ज दिले गेले. शेतकऱ्यांना वीज रस्ते पाणी या तीन गोष्टी मिळाल्या तर तो सोने पिकवतो हे लक्षात घेऊन आमदारकीच्या माध्यमातून प्रवरा नदीवर मध्यमेश्वर बंधारा केल्याने शेतीला मुबलक पाणी मिळत आहे, वीज उपकेंद्रे उभे केले. त्यामुळे पूर्ण दाबाने वीज मिळत आहे.
मधमेश्वर बंधाऱ्याच्या माध्यमातून पूर्वीचे ज्वारीचे शिवार आता उसाचे आगार झाले आहे. शेती व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एआय तंत्रज्ञाचा वापर करून शेती उत्पादनात अधिकाधिक वाढ करण्याची गरज आहे. ऊस लागवडीनंतर सुरवातीच्या काळात लहान बालकांप्रमाणे ऊस पिकाची काळजी घेतली पाहिजे. स्पर्धेच्या युगात उत्पादन वाढीसाठी प्रयत्नांची गरज आहे. आपला उत्कर्ष आणि उन्नती होण्यासाठी शेती, औद्योगिक व अध्यात्मिक क्षेत्र याची सांगड घालणे गरजेचे आहे. सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाने नेवासाच्या अध्यात्मिक वैभवात भर पडली आहे.
*महंत उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की, नरेंद्र घुले पाटील यांनी आमदारकीच्या काळात मधमेश्वर बंधारा केला. बंधारा सतत पाण्याने भरलेला राहत असल्याने पाईपलाईन झाल्या. बारामाही बागायत झाले. नेवासाचा आज जो हिरवागार शिवार दिसतोय त्याचे सर्व श्रेय नरेंद्र घुले पाटील व मधमेश्वर बंधाऱ्याला आहे.
आजचा ऊस परिसंवाद हा शेतकरी हिताचा कार्यक्रम आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे सर्वांचा पोशिंदा आहे, जग जगेल तर केवळ शेतकऱ्यांमुळे जगेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पूर्ण हिताचे निर्णय होणे गरजेचे आहे. परंतु आज ही शेतकऱ्यांच्या पूर्ण हिताचा निर्णय होताना दिसत नाही.माझा मुलगा अधिकारी आहे हे अभिमानाने सांगणाऱ्यावर माझा मुलगा शेतकरी आहे हे सांगण्याची नामुश्कि व्यवस्थेने आणली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा उद्धव महाराजांनी व्यक्त केली.
या शेतकरी परिसंवादास शंकरराव लोखंडे, संभाजी पवार, सुनील वाघ,बाळासाहेब पाटील, प्रकाश जाधव,अंबादास कळमकर, बाळासाहेब धोंडे, संभाजीराव माळवदे, सर्जेराव चव्हाण, हुकुमबाबा नवले, संभाजीराव कार्ले, बाळासाहेब कोकणे, नंदकुमार पाटील, अशोक साळुंके,
रामदास कोरडे, सोपानराव ससे, सुनील हापसे,अनिल हापसे, रवींद्र नवले, सुधीर डौले, रामकृष्ण कांगुणे,भानुदास कावरे, प्रकाश सोनटक्के, जनार्दन हारदे, अप्पासाहेब पटारे, बाळासाहेब नवले, वैभव नवले, रामकृष्ण कांगुणे, जगन्नाथ कोरडे, अनिल लहारे, योगेश रासने, पद्माकर मते, जनार्धन शेळके, आबासाहेब डौले, जगन्नाथ जपे,दिलीपराव पवार, बाबासाहेब भोगे, नवनाथ पठाड़े, दिगंबर शिंदे, पुरुषोत्तम सर्जे, राजू परसय्या, गणेश ढोकणे, राजहंस मंडलिक, रविंद्र कुलकर्णी, माऊली गारुळे, बाळासाहेब तऱ्हाळ, अनिल बोरकर, बाळासाहेब तनपुरे, बाळासाहेब शिंदे, हरिभाऊ बोस्टे, राजेंद्र मापारी, मोजेमखान पठाण, संभाजी ठाणगे, जगन्नाथ जपे, नवनाथ पठाडे, बाबासाहेब सुकाळकर, गोकुळ डौले, सोपान थिटे, रमेश शिंदे, शशिकांत कार्ले, डॉ. शंकर शिंदे, अजित जाधव, हरिभाऊ वरुडे, रामेश्वर जपे आदिसह उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
संचालक काकासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब गंडाळ यांनी स्वागत केले. काशिनाथ पाटील नवले यांनी आभार मानले.