Sunday, March 29, 2026

प्रा.वैभव काकडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

प्रा. वैभव विक्रम काकडे यांनी भगवंत युनिव्हर्सिटी, अजमेर येथून पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

प्रा.वैभव काकडे सध्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, कॉलेज ऑफ फार्मसी, विळदघाट, अहिल्यानगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपला संशोधन प्रबंधनैसर्गिक प्रवेश प्रवर्धकाचा वापर करून एलॅजिक आम्लाच्या नायसोमल जेलचे सूत्रीकरण, अनुकूलन आणि मूल्यांकन“.या विषयावर सादर केला. त्यांच्या संशोधन कार्याला मार्गदर्शक म्हणून *डॉ. रवींद्र लावरे* यांचे मार्गदर्शन लाभले.

या संशोधनाचा उद्देश नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचारोगांवरील औषधांच्या प्रभावकारकतेत वाढ घडवून आणणे हा होता. नियोसोमल जेलच्या स्वरूपात एलाजिक ऍसिडचे सादरीकरण करून औषधाच्या शोषणात सुधारणा व जैवउपलब्धतेत वाढ साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे संशोधन औषधनिर्माण क्षेत्रासाठी नवीन दिशा दाखवणारे ठरले आहे.

प्रा .वैभव विक्रम काकडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य, सहकारी प्राध्यापकवर्ग, विद्यार्थीवर्ग तसेच स्थानिक नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यामुळे महाविद्यालयाचे नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले आहे.

संशोधनाची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि विज्ञानातील नवकल्पनांचा अवलंब यामुळे त्यांनी ही पदवी मिळवली असून, पुढील काळातही ते औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन कार्य सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!