Wednesday, June 24, 2026

खरीप हंगाम पिकांचे पूर्ण नुकसान;विमा कंपन्यांनी ॲक्शन मोडवर यावे-डॉ.ढगे

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात तुफान पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन कपाशी बाजरी मका या पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे जवळजवळ 90% सरासरी पिके पाण्यात वाया गेली आहेत. पिक विमा बाबत शेतकऱ्यांची उदासीनता होती. तरी सुद्धा काही शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला आहे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत तथापि त्यांना अद्यापही विम्याची रक्कम मिळालेली नाही ती त्यांना तातडीने उपलब्ध करावी अशी मागणी कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच अधीक्षक कृषी अधिकारी व पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दखल घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणे आवश्यक आहे कार्यवाही करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचित करावे म्हणजे कार्यवाहीला गती येईल असा आशावाद डॉ. ढगे यांनी व्यक्त केला

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!