Wednesday, March 4, 2026

शेतकऱ्यांनी सर्व ऊस ज्ञानेश्वर कारखान्यालाच द्यावा-मा.आ.नरेंद्र घुले पाटील

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा) 15 जानेवारी माय महाराष्ट्र न्यूज:लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात गळीतास येत असलेल्या ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जिल्ह्यात सर्व प्रथम जाहीर करून त्याप्रमाणे ऊसाचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळच्यावेळी वर्ग करण्यात करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर कारखान्याचा ऊस वजनकाटा पारदर्शक असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सहकारी साखर कारखान्यास परिसरातील संपूर्ण ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे असे आवाहन लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना सांस्कृतिक मंडळाचे वतीने मकर संक्रांतिनिमित्त आयोजित सामुदायिक तिळगुळ वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री.घुले बोलत होते.कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,संचालक काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे,
पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ, प्रा.नारायणराव म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे, शिवाजीराव कोलते,सखाराम लव्हाळे,विकास नन्नवरे, दादासाहेब गंडाळ,माजी संचालक निवृत्ती दातीर,दिलीपराव मोटे, कार्यकरी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.नरेंद्र घुले पाटील पुढे म्हणाले की, लोकनेते मारुतराव घुले पाटील साहेब यांनी सामुदायिक तिळगुळ वाटपाची परंपरा सुरू केली,ती सुरूच आहे. आपला कारखाना तांत्रिक दृष्ट्या परिपुर्ण असून दररोज १० हजार मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप करण्याची क्षमता असल्याने सर्व ऊसाचे वेळेत गाळप पूर्ण होईल, त्यामुळे ऊस बाहेर देण्याची घाई करू नये. विधानसभेत काम करण्याची संधी मिळाल्याने आपण कार्यक्षेत्रात वीज,पाणी व रस्ते या पायाभूत सुविधा निर्माण केल्याने ऊस उत्पादन वाढले, मात्र मोठ्या प्रमाणात ऊस बाहेर जात आहे,ते थांबले पाहिजे. ज्ञानेश्वर कारखाना हा कोणा एकट्याचा नसून ती सर्व शेतकऱ्यांची कामधेनू आहे,या कामधेनूला जपण्यासाठी बाहेर ऊस देऊ नका.प्रत्येक तास आणि प्रत्येक मिनिट महत्वाचा असल्याने अधिकारी-कामगार वर्गाने ही इष्टतम कार्यक्षमतेने काम करून उत्पादन वाढीस हातभार लावावा.ऊस गाळपात आपण जिल्ह्यात नंबर एक वर आहोत, आपल्या सहकार्याने यापुढे ही नंबर एक वरच राहू.
काशिनाथ नवले,काकासाहेब शिंदे, बबनराव धस यांनी ही मनोगत व्यक्त केले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे,दिलीप सरोदे, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, डॉ. शिवाजी शिंदे, नामदेव निकम,अंबादास गोंडे,अड.रविंद्र गव्हाणे, विजयकुमार नवले,वैभव नवले, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.श्यामसुंदर कौशिक, प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, हुकूम बाबा नवले,चंद्रकांत कामठे, दत्तात्रय विधाटे, दत्ता माळवदे,बाळासाहेब धोंडे, दत्तात्रय खाटीक,सुदाम आरगडे, संदीप फुलारी, किसन यादव,सुभाष म्हस्के,चंद्रकांत फुलारी, भाऊसाहेब चौधरी, बलभीम फुलारी, गुलाबराव आढागळे, करखान्याचे तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे, महेंद्र पवार, अप्पासाहेब खरड,भगवंता शेंडगे, सुधाकर ढाकणे, मुख्य अभियंता राहुल पाटील,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के,मुख्य लेखापाल रामनाथ गरड, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख,हेड टाईम किपर नेव्हल, प्राचार्य शिवाजी मुंगसे, प्राचार्य सोपान मते,प्राचार्य विजय देशमुख, दादासाहेब वाबळे, इब्राहिम सय्यद,भारत साबळे, रामकृष्ण नवले,
जिल्हा बँक शाखाधिकारी सुरेश काळे,
राजेंद्र काकडे,सांस्कृतिक मंडळाचे सचिव नंदकिशोर पाटील,सहसचिव अशोक धुमाळ, खजिनदार वसंत दुकळे,सहखजिनदार सोयब शेख,मानद सचिव अप्पासाहेब बोडखे,श्रीरंग जाधव, संभाजीराव माळवदे, संजय राऊत,अंकुश दाभाडे,सुरेश उगले,संभाजी भुसारी,सचिन निकम, आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब गंडाळ यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!