Sunday, March 29, 2026

शिंवगेतुकाई येथील तलावचे अनाधिकृत उत्खनना विरोधात शेतकऱ्यांचे उपोषण सूरु

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावातील तलावाचे अनाधिकृत उत्खनन होऊन असल्यामुळे शेतरस्ताच बंद झाल्याने शेतकऱ्यांनी उत्खनन स्थळी उपोषण सूरु केले आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावात चांदा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणी साठवण तलाव आहे. काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमीनीत जाण्या-येण्यासाठी तलावाचे भरावा लगत रस्ता आहे. सदर भरावाचे अनाधिकृत उत्खनन करून माती व मुरुम विकले जात आहे. सदर भराव तोडल्याने हा शेतरस्ता बंद झाला आहे.
रस्ता नसल्याने माझ्या शेतीचे कामकाज बंद पडले आहे. उत्खननामुळे त्या जमिनीत मला जायला रस्ता राहिला नाही.शासनाने याची दखल घेवून कारवाई करावी,कारवाई न केल्यास दि.२७ जानेवारी २०२६ रोजी जिथे उत्खनन सुरु आहे त्या ठिकाणी मी आणि इतर शेतकरी उपोषणाला बसू
असे निवेदन पांडुरंग होंडे यांनी दि. ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना दिले होते.

परंतु प्रशासनाने याबाबद कोणती ही दखल न घेतल्याने मंगलवार दि.२७ जानेवारी पासून पांडुरंग होंडे, शिवाजी होंडे, सुदाम पवार, विठ्ठल पवार, संभाजी होंडे, सुनील विधाटे, संतोष थोरात, संजय होंडे,बाळासाहेब होंडे, संकेत पवार, वैभव पवार या शेतकऱ्यांनी महिलांसह उत्खनन स्थळी उपोषण सूरु केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!