Sunday, March 29, 2026

शिक्षणाच्या वाटेला अध्यात्माची कल्हाई करा-प्रकाश महाराज बोधले

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

मुलांना उत्तम तंत्रज्ञानाचे शिक्षण द्या. शिक्षणाच्या वाटेला अध्यात्माची कल्हाई करा, जीवन सार्थ ठरेल असा मौलिक सल्ला अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी दिला.

नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त सुरु असलेल्या राज्यस्तरीय किर्तन महोत्सवाचे २ रे पुष्प गुंफताना ‘माझ्या वडीलाची मिरासिगा देवा’ या अभंगाचे निरुपण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजक प्रा. गणेश घालून त्यांचे पूजन केले.

बोधले महाराज म्हणाले, पंढरपुरची वारी ही भगवत प्राप्तीची साधना आहे. संत गजानन महाराज, स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा यांची उपासना वेगळ्या पध्दतीची असली व भगवत प्राप्ती हेच ध्येय होते. त्यामुळे कुठलेही कार्य करताना हेतू शुध्द असेल तर कार्य सिध्दीस जात.
प्रा. गणेश देशमुख व परिवाराचा हेतू शुद्ध सात्त्विक होता म्हणून एवढा मोठा जनसमुदाय भक्तीरसात न्हाऊन निघत असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. संसारातील गाडी, बंगला पैसा हे भौतिक सुख क्षणिक सुख आहे. मात्र आत्मकल्याणासाठी भक्ती हीच खरी
संपत्ती असल्याचे ते म्हणाले. निरोगी शरीर व सतप्रवृती म्हणजेच अध्यात्म असल्याचे ते म्हणाले. अनुकुल प्रतिकुल परिस्थितीत वंश परंपरेने केलेल्या परमार्थाची किंमत लाखमोलाची असते. परंपरेमुळे भक्तीभाव दृढ असतो. हा ज्ञानोबा, तुकोबांच्या परंपरेचा जगाच्या पाठीवरचा सर्वात मोठा सांप्रदाय असून चंद्र-सूर्य असेपर्यंत तो अबाधित राहील. तसेच या सांप्रदायामुळेच संस्कार टिकून असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तंत्रज्ञांच्या युगातही जुन्या रुढी-परंपरा पुढे येत असल्याचे अनेक दाखले त्यांनी यावेळी दिले.
मुलांना उत्तम तंत्रज्ञानाचे शिक्षण द्या. शिक्षणाच्या वाटेला अध्यात्माची कल्हाई करा, जीवन सार्थ ठरेल असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.
पती-पत्नींनी एकमेकाना समजून घेत संसार केला तर घराचं मंदीर बनेल व पुढची पिढी सुसंस्कारी बनेल. स्वर्गीय मारुतराव घुले पाटील व जिल्ह्यातील नेत्यांच्या नियोजनाने नगर जिल्ह्याचे सहकार क्षेत्र हे राज्याला दिशादर्शक असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

यावेळी उद्धव महाराज शिंदे, कृष्णा महाराज भोरकडे, चैतन्य महाराज नवल, बाबासाहेब महाराज जाधव, रामनाथ महाराज पवार, अशोक महाराज साळुके, अनिल महाराज गरुड, प्रसाद महाराज कराड, डॉ. शिरिष लांडगे, डॉ. नारायण म्हस्के, रोहिदास लंघे, सुनिल नजन, बबनराव तांबे, जियावुल शेख, कैलास कपिले, अश्पाक शेख, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!